Karishma Kapoor | बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेश्नल लाईफ बरोबरच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. करिश्माने 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आज देखील करिश्माचा चाहता वर्ग टिकून आहे. करिश्मा कपूर बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीमध्ये सक्रिय नाही. अशात करिश्माने केलेल्या एका खुलाश्यामुळे सध्या तिची जोरदार चर्चा रंगली आहे. करिश्माने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय.
काय म्हणाली करिश्मा?
एका मुलाखतीत बोलत असताना करिश्माने (Karishma Kapoor) तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. करिश्माचं लग्न बिझनेसमन संजय कपूरसोबत झालं होतं. मात्र कायम होत असलेल्या मतभेदामुळे या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
करिश्माने (Karishma Kapoor) तिच्या हनीमूनचा एक प्रसंग सांगितला आहे. ‘हनीमूनच्या दिवशी संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला लावलं. मी नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर माझा लिलाव केला’, असा धक्कादायक खुलासा करिश्माने केला आहे.
सासूकडून मारहाण-
‘माझ्या गरोदरपणात माझ्या सासूबाईंनी एक ड्रेस माझ्यासाठी आणला होता, पण तो मला नीट बसला नाही. तेव्हा संजयने माझ्या सासूबाईंना मला मारायला सांगितलं’, असंही करिश्मा म्हणाली आहे.
News Title : Karishma Kapoor Reveals truth
महत्त्वाच्या बातम्या-
सानिया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करणार?; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सानिया मिर्झाचा एक्स नवरा शोएब मलिकने केली मोठी घोषणा; म्हणाला, “पुन्हा एकदा..”
अमिताभ बच्चन यांचे सून ऐश्वर्याशी अजूनही पटत नाही?; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण






