Kareena Kapoor | बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) नेहमीच आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने इंटिमेट आणि सेक्स सीन्सबाबत परखड विचार मांडले आहेत. चित्रपटातील अशा दृश्यांची गरज नसते आणि ती स्वतः असे सीन्स करण्यास कम्फर्टेबल नाही, असे मत करीनाने व्यक्त केले आहे.
सेक्स सीन्स महत्त्वाचे?
बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स सामान्य झाले असले तरी प्रत्येक अभिनेत्री त्यासाठी तयार असेलच असे नाही. एका मुलाखतीत करीना (Kareena Kapoor) म्हणाली, “एखाद्या चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी सेक्स सीन्स महत्त्वाचे नसतात. ही अशी गोष्ट नाही की ती दाखवलीच पाहिजे. मी यापूर्वी कधीच असे सीन्स केले नाहीत आणि भविष्यातही करणार नाही.”
View this post on Instagram
करिअरच्या सुरुवातीपासूनच करीनाने अशा दृश्यांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा अशा दृश्यांचा वापर होतो, मात्र ती त्याला विरोध करत असल्याचे स्पष्ट केले.
लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन-
यावेळी करीनाने (Kareena Kapoor) भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेवरही भाष्य केले. “लैंगिकता किंवा सेक्स याकडे आपण मानवी अनुभव म्हणून पाहत नाही. हे ऑनस्क्रीन दाखवण्याआधी त्याचा योग्य दृष्टिकोनातून विचार करणे महत्त्वाचे आहे. पाश्चिमात्य देशांप्रमाणे आपण या गोष्टींबाबत मोकळेपणाने विचार करत नाही,” असे ती म्हणाली.
करिनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ती नुकतीच ‘सिंघम अगेन’ (Singham Again) मध्ये झळकली होती. तसेच, लवकरच ती मेघना गुलजार (Meghna Gulzar) दिग्दर्शित ‘दायरा’ (Daira) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.






