Kalyan Crime | कल्याण टिटवाळा (Kalyan Crime) भागात महिलाविरोधात अत्याचाराची एक संतापजनक घटना घडली आहे. गावगुंडांनी एका विवाहितेचा विनयभंग करत भर रस्त्यात तिला नग्न करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, तिच्या पतीने मदतीसाठी धाव घेतली असता त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांकडून कठोर कारवाई होण्याऐवजी फक्त एनसी (Non-Cognizable) दाखल करण्यात आली, ज्यामुळे पीडित कुटुंबाला न्यायासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली.
गावगुंडांची विकृत मागणी
पीडित महिलेला त्रास देणाऱ्या गुंडांनी तिच्या पतीकडे “या भागात राहायचे असेल, तर तुझी बायको आमच्याकडे पाठव” अशी संतापजनक मागणी केली. रस्त्यावरच तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांनी फक्त एनसी दाखल करून प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला.
ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो (Swargate ST Depot) परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना, आता कल्याणमध्ये अशा प्रकारची घटना समोर आल्याने महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित कुटुंबाने न्याय मिळावा म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. (Kalyan Crime)
मात्र, कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश कदम (Suresh Kadam) यांनी पीडितेने केलेले आरोप फेटाळले आणि ही दोन गटांमधील वादाची घटना असल्याचे सांगितले. त्यांनी व्हिडिओची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
Title : Kalyan Crime Shocking Incident of Harassment






