“पुणेकरांना समुद्र नसल्याची खंत होती, म्हणून भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला”

On: June 9, 2024 1:05 PM
Jayant Patil Target Shinde Government on Pune Water Logging Situation
---Advertisement---

Jayant Patil | पुण्यात काल (8 जून) मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे पुण्यातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं. सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी पुण्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तर काही ठिकाणी नागरिकांच्या दुकानांतील सामानाचेही नुकसान झालं आहे.

पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जणू पाण्यातच गेल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.जयंत पाटील यांनी एक ट्विट करत सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

जयंत पाटील यांचं ट्वीट चर्चेत

“काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे.”, असं ट्वीट जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी केलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, “पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!”, असा सणसणीत टोला जयंत पाटील यांनी ट्वीट करत लगावला आहे.

मुसळधार पावसाने पुणेकर हैराण

दरम्यान, पुण्यातील बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं आहे. पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात अजूनही पाणी साचलेले आहे. भुयारी मार्गात असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे सामनाचं अतोनात नुकसान झालंय. पुण्यातील या स्थितीवरूनच जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीत एकूण 55 ठिकाणी पाणी शिरलं आहे. तर, अग्नीशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री लोहगाव, कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या 3 जणांना वाचवलंय.

News Title- Jayant Patil Target Shinde Government on Pune Water Logging Situation

महत्वाच्या बातम्या-

शिंदेंच्या ‘या’ खासदाराला आला मंत्रिपदासाठी फोन, अजित पवारांचा गट अजून वेटिंगवर

मंत्रिपदाची हंडी फुटली!, महाराष्ट्रातील ‘या’ 5 नेत्यांना मंत्रिपदासाठी आले फोन

‘या’ राशीच्या व्यक्तींचं आज भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील

लहान मुलांमधील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक; काय काळजी घ्याल?

राज्यात मॉन्सून दाखल, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?, हवामान विभागाकडून महत्वाचा सल्ला

Join WhatsApp Group

Join Now