“रावण रेपिस्ट होता, त्याने सीतेला…”; जया किशोरी यांचं वक्तव्य चर्चेत

On: March 6, 2025 9:03 AM
Jaya Kishori Sparks Controversy Calls Ravana a Rapist
---Advertisement---

Jaya Kishori | प्रसिद्ध कथावाचक आणि मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी (Jaya Kishori) यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. रावणाच्या व्यक्तिरेखेवर भाष्य करताना त्यांनी रावणाला ‘रेपिस्ट’ संबोधलं असून, त्याने सीतेला स्पर्श न केल्यामागे एक वेगळं कारण असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘रावणाने सीतेला नाईलाजाने स्पर्श केला नाही’

एका पॉडकास्टदरम्यान जया किशोरी यांनी सांगितलं की, अनेकजण रावणाची स्तुती करतात आणि म्हणतात, ‘मला रामासारखा नवरा नको, रावणासारखा हवा, कारण त्याने सीतेला स्पर्शदेखील केला नाही.’ मात्र, हे समजून घेण्याची गरज आहे की, रावणाने सीतेला हात लावला नाही, याचा अर्थ तो सद्गुणी नव्हता. त्यामागे त्याला ब्रह्मदेवाचा (Brahmadev) शाप होता.

‘रावणाने अप्सरेवर बलात्कार केला होता’

रावणाच्या पूर्वीच्या कृतींबद्दल सांगताना जया किशोरी म्हणाल्या की, रावणाने रंभा (Rambha) नावाच्या एका अप्सरेवर बलात्कार केला होता. रंभा कुबेराची (Kuber) सून होती. जेव्हा रावणाने तिच्यावर जबरदस्ती केली, तेव्हा ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची व्यथा मांडली. यानंतर ब्रह्मदेवाने रावणाला शाप दिला की, जर त्याने कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श केला, तर त्याचे शंभर तुकडे होतील. या भीतीमुळेच रावणाने सीतेला स्पर्श केला नाही, असा दावा जया किशोरी यांनी केला आहे.

सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया 

जया किशोरी (Jaya Kishori) यांच्या या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्याला कडाडून विरोध केला आहे. अनेक महिला ‘रावणाने कधीच परस्त्रीला स्पर्श केला नाही’ या मतावर ठाम आहेत, तर काही जण जया किशोरी यांच्या दाव्याशी सहमत आहेत.

Title : Jaya Kishori Sparks Controversy Calls Ravana a Rapist

 

Join WhatsApp Group

Join Now