दुर्दैवी! वडिलांचा चेहराही न पाहिलेल्या लेकीचं अंत्यदर्शन; पत्नीच्या सुटलेल्या आक्रोशाने आभाळ फाटलं

On: January 11, 2026 6:26 PM
Pramod Jadhav
---Advertisement---

Pramod Jadhav | देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर जीव धोक्यात घालणाऱ्या भारतीय जवानांच्या आयुष्यातील वेदनादायी वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. सातारा जिल्ह्यातून अशीच मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली असून, पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

देशसेवेचा अभिमान बाळगत आपल्या कुटुंबासाठी काही दिवस सुट्टीवर आलेला जवान अशा दुर्दैवी पद्धतीने काळाच्या पडद्याआड जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. या घटनेने केवळ एका कुटुंबाचंच नव्हे, तर संपूर्ण गावाचं आणि राज्याचं मन सुन्न केलं आहे.

वीर जवान प्रमोद जाधव यांचे अपघाती निधन :

सातारा जिल्ह्यातील दरे गावचे रहिवासी प्रमोद परशुराम जाधव हे भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद-श्रीनगर येथे कार्यरत होते. आई नसल्यामुळे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते काही दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावी आले होते. मात्र, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. काही कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना वाढे फाटा परिसरात आयशर टेम्पोने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. (Jawan Wife Delivery Tragedy)

या भीषण अपघातात प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि नवजात कन्या असा परिवार आहे. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेला जवान अशा अवस्थेत गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Pramod Jadhav | अपघातानंतर काही तासांतच लेकीचा जन्म :

या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या काही तासांत प्रमोद जाधव यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, ज्यासाठी प्रमोद सुट्टीवर आले होते, त्या लेकीचा चेहराही पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही. ही बाब ऐकून आणि पाहून उपस्थित प्रत्येकाचं काळीज पिळवटलं. (Indian Army Soldier Accident)

अंत्यसंस्काराच्या वेळी प्रमोद जाधव यांची पत्नी स्ट्रेचरवर, हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत आणि कुशीत काही तासांची नवजात मुलगी घेऊन अंत्यदर्शनासाठी आली होती. तो क्षण पाहून गावकऱ्यांसह उपस्थित हजारो नागरिकांचे डोळे पाणावले. देशासाठी सेवा करत असताना कुटुंबासाठी आलेल्या जवानाचा असा अंत महाराष्ट्राला हादरवणारा ठरला. तसेच शासकीय इतमामात प्रमोद जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्ययात्रेत परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.

News Title: Jawan Dies in Accident After Returning Home for Wife’s Delivery; Newborn Daughter at Funeral Leaves Maharashtra in Tears

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now