Jalna Loksabha l उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत जालना जिल्हा केंद्रस्थानी ठरला आहे. कारण जालना जिल्हा चांगलाच चर्चेत राहिला आहे. जालना मतदार संघात भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्यात थेट लढत झाली आहे.
जालन्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार :
भाजपचा बालेकिल्ला असलेला जालना मतदार संघ हा गेल्या 20 वर्षांपासून रावसाहेब दानवे यांच्याकडे आहे. कारण या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व रावसाहेब दानवे हे करतात. मात्र यावेळी कल्याणराव यांनी रावसाहेब दानवेंना जबरदस्त टक्कर दिली आहे. कारण रावसाहेब दानवेंच्या समोर कल्याणराव काळे यांचं मोठं आवाहन उभं राहील होत.
अशातच दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे जालन्यातील राजकारण चांगलेच बदललेलं दिसलं आहे. त्यामुळे आता यावेळी जालन्याच्या राजकारणात नेमके काय होणार? याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
Jalna Loksabha l जालन्यात दिग्गज मंडळींनी प्रतिष्ठा लावली पणाला :
लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपचे रावसाहेब दानवे यांचे पारडे जड गेल्याचे मानले जात होते. तसेच त्यावेळी जालना जिल्ह्यातील निवडणूक एकतर्फी होणार की काय असे तर्क वितर्क लावले जात होते. पण ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच दिग्गज नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती.
कारण महाविकास आघाडीचे नेते कल्याणराव काळे यांच्यासाठी या मतदारसंघात माविआच्या अनेक बड्या नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. त्यामुळे जालना मतदारसंघात प्रचाराच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात चित्र बदलल्याचे दिसले आहे. त्यामुळे जालन्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.
जालना लोकसभा मतदारसंघ हा लोकसंख्येच्या दृष्टीने देखील मोठा असल्याचे बोलले जात आहे. कारण जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), सिल्लोड, पैठण, फुलंब्री या एकूण सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश होत आहे.
News Title – Jalna Lok Sabha Election Result
महत्त्वाच्या बातम्या-
प्रवास करणे महागले; टोल टॅक्सच्या किंमती तब्ब्ल ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला मान्सून महाराष्ट्रात धडकणार
सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका, दुधाच्या किंमतीत वाढ
आज या राशीच्या राजकीय व्यक्तींना जनतेचा पाठिंबा असल्याचं दिसून येईल
‘…नाहीतर मी स्वत:ला संपवून घेईन’; बजरंग सोनवणेंच्या वक्तव्याने खळबळ






