जळगाव-पुणे विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर!

On: February 10, 2025 10:52 AM
Pune to Goa Flight Ticket
---Advertisement---

Jalgaon-Pune Flight l जळगाव विमानतळावरून (Jalgaon Airport) उडान योजनेंतर्गत (UDAN Scheme) गोवा (Goa), पुणे (Pune), हैदराबाद (Hyderabad), तसेच मुंबई (Mumbai) व अहमदाबाद (Ahmedabad) विमानसेवा नियमित सुरू आहे.

गेल्या एक-दोन महिन्यांपासून विमान ऐनवेळी रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती विमान कंपनीकडून (Airline Company) दिली जात नसल्याने प्रवाशांची ऐनवेळी विमानतळावर तारांबळ उडत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

वेळापत्रकात बदल :

दरम्यान, जळगाव-पुणे या आठवडाभर असलेल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करून ते आता चार दिवस करण्यात आले आहे.

Jalgaon-Pune Flight l प्रवाशांची गैरसोय :

विमान ऐनवेळी रद्द होण्याचे प्रकार वाढल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विमान कंपन्यांकडून प्रवाशांना वेळेवर माहिती दिली जात नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

News title  : Jalgaon-Pune Flight Service Reduced to Four Days a Week

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now