मासिक पाळीत स्वयंपाक केल्याची भयंकर शिक्षा, सासू – नणंदेच्या कृत्याने जळगाव हादरलं!

On: May 3, 2025 7:16 PM
pune news
---Advertisement---

Jalgaon News | जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील किनोद तांडा (Kinod Tanda) येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. मासिक पाळी सुरू असताना घरात स्वयंपाक केल्यामुळे ‘विटाळ’ (ritual impurity) झाला, या कारणावरून एका २६ वर्षीय विवाहित महिलेची तिच्याच सासू आणि नणंदेने मिळून हत्या केल्याचा गंभीर आरोप महिलेच्या भावाने केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

‘विटाळ’ मानून अमानुष मारहाण –

गायत्री ज्ञानेश्वर कोकरे (Gayatri Dnyaneshwar Kokare) असे हत्या झालेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास (Jalgaon News) ही घटना घडली. गायत्रीची मासिक पाळी सुरू होती आणि तिने घरातील स्वयंपाक केला. ही बाब तिच्या सासूला आणि नणंदेला सहन झाली नाही. त्यांनी ‘विटाळ’ झाल्याचे कारण पुढे करत गायत्रीला बेदम मारहाण केली आणि नंतर तिचा गळा दाबून जीव घेतला, असा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.

मृत गायत्रीचा पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. ती आपल्या सासरच्या घरी, किनोद तांडा येथे राहत होती. घडलेल्या या प्रकारामुळे समाजात प्रचलित असलेल्या मासिक पाळीबाबतच्या चुकीच्या आणि अमानुष रूढींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांचा तपास सुरू; नातेवाईकांचा संताप-

गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची माहिती गायत्रीच्या भावाला मिळाल्यानंतर त्याने तातडीने धाव घेतली. गायत्रीला गंभीर अवस्थेत जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (District Government Medical College) उपचारासाठी नेण्यात आले, परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यानंतर गायत्रीच्या माहेरच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला. घटनेनंतर आरोपी सासू आणि नणंद फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेमुळे गायत्रीची सात वर्षांची (Jalgaon News) मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा पोरके झाले आहेत. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, गायत्रीच्या भावाने केलेल्या आरोपांच्या आधारावर आता हत्येच्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. जोपर्यंत आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

News Title – Jalgaon News Woman Allegedly Killed for Menstrual Cooking

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now