“बेबी..आपली लव्हस्टोरी रामायणापेक्षा कमी नाही”; सुकेशचं जॅकलिनला आणखी एक पत्र

On: October 31, 2024 8:49 AM
Jacqueline Fernandez and Sukesh Chandrashekhar
---Advertisement---

Jacqueline Fernandez | सुकेश चंद्रशेखर 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं (Jacqueline Fernandez) नाव डिसेंबर 2021 मध्ये समोर आलं होतं. त्यानंतर ईडीच्या चौकशीत जॅकलीनलाही आरोपी ठरवलं गेलं. या प्रकरणात तिची अनेकदा चौकशी देखील झाली आहे. सुकेश आणि जॅकलीन यांच्या नात्याबद्दल अजूनही चर्चा होत असताना. दोघेही बराच काळ नात्यात होते. जॅकलीनचा प्रियकर सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) तुरुंगात असताना देखील जॅकलीनसाठी नेहमीच प्रेमपत्र लिहिलं आहे.

अशात दिवाळीच्या निमित्ताने त्याने अभिनेत्रीला आणखी एक पत्र लिहिल्याचं समोर आलंय. काही मीडिया रिपोर्टमध्ये या पत्राबाबत दावा करण्यात आलाय. या पत्रात सुकेशनं त्याची आणि जॅकलिनची लव्हस्टोरी रामायणासारखीच असल्याचं म्हटलंय. त्याने पत्रात आणखी काय लिहिलंय ते देखील समोर आलं आहे.

सुकेशने पत्रात नेमकं काय म्हटलंय?

काही मीडिया वृत्तानुसार, सुकेश चंद्रशेखर याने जॅकलीनला (Jacqueline Fernandez) पत्रात म्हटलं की, “बेबी..आपली लव्ह स्टोरी महान रामायणापेक्षा कमी नाही, कारण जसे माझे भगवान राम वनवासातून सीतेसोबत परतले होते, तसेच मीदेखील माझी सीता जॅकलिनसाठी या छोट्याशा वनवासातून परत येणार आहे, जेणेकरून मी तुला परत मिळवू शकेल आणि कोणताही रावण हे होण्यापासून रोखू शकत नाही.”

पुढे सुकेशने लिहिलं की, “प्रभू रामाचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे, आता माझी परत येण्याची वेळ जवळपास आली आहे बेबी, मी एकत्र राहण्यासाठी आणि पुढच्या वर्षी एकत्र दिवाळी साजरा करण्यासाठी आता थांबू शकत नाही.लंकेतली तुझ्याशिवाय ही माझी शेवटची दिवाळी असेल.”, अशा आशयाचं पत्र सुकेशने जॅकलिनला लिहिलं असल्याचं समोर आलंय. हे पत्र आता जोरदार व्हायरल होत आहे.

जॅकलिन दिसणार ‘या’ चित्रपटात

दरम्यान, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) वर्क फ्रंटबाबत बोलायचं झाल्यास ती काही दिवसांपूर्वीच झिक व्हिडीओ ‘स्टॉर्मराइडर’ मध्ये दिसली होती. सध्या ती अक्षय कुमार स्टारर ‘हाऊसफुल 5’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 2025 मध्ये रिलीज होणार आहे.

News title – Jacqueline Fernandez and Sukesh Chandrashekhar

महत्त्वाच्या बातम्या-

आज नरक चतुर्दशी, कुणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार?; वाचा राशीभविष्य

2024 मध्ये ‘या’ पक्षाचा असणार मुख्यमंत्री; राज ठाकरेंचं भाकीत

अमित शाह महाराष्ट्रात जादूची कांडी फिरवणार? ‘इतक्या’ सभा घेणार

मनसेला निवडणूक आयोगाकडून सर्वात मोठा धक्का!

पालघरमध्ये मोठा राजकीय ड्रामा, आता संपूर्ण वनगा कुटुंब बेपत्ता

Join WhatsApp Group

Join Now