Job Update | भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने म्हणजेच ISRO ने भारतीय अंतराळ क्षेत्रात करियर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ISRO अंतर्गत येणाऱ्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) साठी इंजिनीअर आणि सायंटिस्ट पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 6 ऑक्टोबर 2025 ऑनलाईन अर्ज करू शकता. यावेळी एकूण 17 पदे इंजिनीअरची भरली जाणार आहेत. 22सप्टेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरु आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर सोबतच इतर अंतराळ केंद्रासाठी देखील यामधून भरती होणार आहे.
(ISRO Job Update)
कोणता वयोगट अर्ज करू शकतो? :
या 17 पदांपैकी पोस्ट कोड 1554 ते 1558 च्या नियुक्त्या ह्या VSSC मध्ये होणार असून, पोस्ट कोड 1559 ते 1560 च्या नियुक्त्या ISRO च्या इतर सेन्टरला होणार आहेत.
उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत 30 वर्ष असले पाहिजे. त्याच बरोबर केंद्रीय कर्मचाऱ्यांना, पूर्व सैनिकांना आणि दिव्यांगासाठी सरकारी आदेशानुसार वयोगटात सूट देण्यात येईल.
अर्ज करण्याचा निकष (criteria) :
अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक योग्यता असणं सर्वात महत्वाचं आहे. तुमचं शिक्षण granted म्हणजे मान्यता प्राप्त कॉलेज मधून होणे महत्वाचे आहे. B.E./ B. Tech आणि M.E / M. Tech झालेल्या उमेदवार या भरती साठी ग्राह्य धरले जातील. (ISRO Job Update)
B.E./ B. Tech साठी कमीत कमी 65% आणि M.E / M. Tech साठी 60% मार्क असणं अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे ज्याउमेदवारांनी AMIE (Associate Member of the Institution of Engineers) साठी 31 मे 2013 च्या आधी रेजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे.
पगार आणि भत्ता कसा असेल? :
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवरांना 56,100 रुपये ते 1,77,500 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. त्याच बरोबर महागाई भत्ता (DA), घरभाड्याचा भत्ता (HRA) आणि वाहन भत्ता(TA) याचा देखील उमेदवारांना लाभ होणार आहे.
News title : ISRO Job Update 2025