Ishan Kishan Girlfriend | भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर दमदार फलंदाजी करणाऱ्या इशान किशन (Ishan Kishan) याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी चर्चा रंगली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला असून, तो नेमका कोणासोबत विवाहबंधनात अडकणार याबाबत कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आजोबांची स्पष्ट भूमिका :
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत नामिबियाविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळी साकारल्यानंतर इशानकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. सध्या तो कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या हायव्होल्टेज लढतीसाठी सज्ज आहे. विश्वविजेतेपदाचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून मैदानात उतरणाऱ्या या युवा फलंदाजाच्या लग्नाबाबत मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
इशानचे आजोबा अनुराग पांडे (Anurag Pandey) यांनी दिलेल्या मुलाखतीत याबाबत भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, इशान यावर्षी लग्न करेल की नाही याची निश्चित माहिती नाही. मात्र तो जिची निवड करेल, त्या मुलीला कुटुंबाकडून पूर्ण स्वीकार दिला जाईल. मोठ्या भावाने पल्लवीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हाही कुटुंबाने तो मान्य केला होता. त्यामुळे इशानच्या निर्णयालाही तेवढ्याच आनंदाने पाठिंबा दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Ishan Kishan Girlfriend | आदितीबाबत चर्चेला उधाण :
अनुराग पांडे यांनी पुढे सांगितले की, अदिती ही इशानची मैत्रीण असून ती जयपूरमध्ये वास्तव्यास आहे. ती व्यावसायिक मॉडेल आहे आणि मिस इंडिया स्पर्धेत उपविजेती ठरली होती. मुलांना जिथे आनंद मिळतो, तो निर्णय स्वीकारणे आवश्यक आहे; लोक काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले. (Ishan Kishan Girlfriend)
आदिती हुंडिया (Aditi Hundia) हिने मिस डीवा २०१८ (Miss Diva 2018) स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. सोशल मीडियावर तिची मोठी लोकप्रियता असून जाहिराती आणि मॉडेलिंगमधून ती कोट्यवधींची कमाई करते. तिची एकूण संपत्ती सुमारे १२ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे वृत्त आहे. २०१९ च्या आयपीएल अंतिम सामन्यात दोघांची पहिली भेट झाल्याची चर्चा आहे. त्यावेळी ती ‘मिस्ट्री फॅनगर्ल’ म्हणून चर्चेत आली होती. त्यानंतर सोशल मीडियावरील परस्पर लाइक्स आणि कमेंट्समुळे दोघांच्या नात्याबाबत अंदाज व्यक्त होत होते. आता कुटुंबीयांच्या वक्तव्यामुळे लग्नाच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे.






