क्रिकेटप्रेमींनो सज्ज व्हा! IPL 2026 चं वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

On: March 11, 2026 7:00 PM
IPL 2026 Schedule
---Advertisement---

IPL 2026 Schedule | क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 संपल्यानंतर आता जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग असलेल्या आयपीएलच्या 19 व्या मोसमाची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर या मोसमातील पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून 28 मार्चपासून आयपीएल 2026 चा थरार रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 20 सामने खेळवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

28 मार्चपासून आयपीएलला सुरुवात :

टी-20 वर्ल्डकपचा एक महिन्याचा थरार नुकताच पार पडला. 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान झालेल्या या स्पर्धेत 20 संघांमध्ये 50 हून अधिक सामने झाले. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषक जिंकला. या मोठ्या विजयानंतर आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष पुन्हा आयपीएलकडे लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या 19 व्या हंगामाची सुरुवात 28 मार्चपासून होणार आहे. 28 मार्च ते 12 एप्रिलदरम्यान पहिल्या टप्प्यातील सामने खेळवले जाणार आहेत. या कालावधीत एकूण 20 सामन्यांचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे. या मोसमातील उद्घाटनाचा सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

IPL 2026 Schedule | संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर नाही :

दरम्यान, आयपीएल 2026 च्या संपूर्ण मोसमाचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन बीसीसीआयने सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पुढील सामन्यांचं वेळापत्रक निवडणुकांच्या तारखांनुसार जाहीर केलं जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे आयपीएल चाहत्यांना सुरुवातीला मर्यादित सामन्यांचा आनंद घेता येणार असला तरी पुढील टप्प्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलचा थरार आणि उत्साह प्रचंड असणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

News Title: IPL 2026 Schedule Announced: Tournament Starts on March 28, First Phase to Feature 20 Matches

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now