IPL 2026 | Indian Premier League 2026 चा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच BCCI ने या भव्य स्पर्धेची जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा कोणत्या दोन टीम IPL 2026 ची ओपनिंग करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्या दोन टीम कोणत्या असणार आता समोर आलं आहे.
आयपीएल 2026 चे रणशिंग 2 मार्चपासून फुंकले जाणार असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या भव्य स्पर्धेची जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी पाच राज्यांतील निवडणुकांचे वेळापत्रक लक्षात घेता, यावेळचे आयपीएल दोन टप्प्यांत आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय (BCCI) १२ मार्च रोजी पहिल्या २० सामन्यांच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करू शकते. यावेळच्या हंगामाची सुरुवात परंपरेनुसार गतविजेत्या आणि उपविजेत्या संघांऐवजी दोन दिग्गज प्रतिस्पर्धी संघांच्या लढतीने होण्याची चिन्हे आहेत.
IPL 2026 पहिली मॅच कोण खेळणार?
‘क्रिकबझ’ने (Cricbuzz) दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएल 2026 चा पहिला थरार 2 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bengaluru) यांच्यात पाहायला मिळू शकतो. हा सलामीचा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) खेळवला जाण्याची शक्यता आहे. साधारणपणे नव्या हंगामाचा पहिला सामना मागील वर्षीच्या अंतिम फेरीतील दोन संघांमध्ये होतो, परंतु यावर्षी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी बीसीसीआयने हा बदल केल्याचे समजते.
Possible opener brewing…
Defending champions RCB could begin the new IPL season against CSK in one of the league’s marquee rivalries.#IPL #IPLUpdate #IPL2026 pic.twitter.com/LxX9BaDCFl
— Cricbuzz (@cricbuzz) March 11, 2026
दुसरीकडे, पंजाब किंग्स (Punjab Kings) आपला पहिला सामना २९ मार्च रोजी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध मुल्लानपूर (Mullanpur) येथे खेळण्याची शक्यता आहे. वेळापत्रकाबाबत अद्याप कमालीची गुप्तता पाळली जात असली, तरी पहिल्या टप्प्यातील सामन्यांची ठिकाणे निवडणुकीच्या तारखांशी ताळमेळ राखूनच निश्चित केली जाणार आहेत. यामुळे चाहत्यांना आपल्या लाडक्या खेळाडूंना मैदानात पाहण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना दिलेल्या माहितीनुसार, 25 मार्च रोजी मुंबईत (Mumbai) सर्व संघांचे कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक यांची वार्षिक बैठक पार पडणार आहे. या बैठकीचा अधिकृत अजेंडा अद्याप स्पष्ट करण्यात आला नसला, तरी स्पर्धेच्या नियमावलीतील संभाव्य बदल आणि नवीन तांत्रिक सुधारणांबाबत यामध्ये चर्चा होऊ शकते.
याशिवाय, 15 मार्च रोजी नवी दिल्ली (New Delhi) येथे सर्व 10 संघांच्या कर्णधारांचे विशेष फोटोशूट (Photoshoot) आयोजित करण्यात आले आहे. आयपीएलच्या प्रसिद्धीसाठी आणि अधिकृत प्रसारणासाठी हे फोटोशूट केले जाते. 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या महाकुंभासाठी सर्व संघ सध्या कसून सराव करत असून, खेळाडूंच्या लिलावानंतर बदललेल्या संघरचनेमुळे यावर्षीची स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.






