सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्या ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ वाढणार?

On: July 5, 2026 6:40 PM
DA Hike
---Advertisement---

DA Hike | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जुलै 2026 पासून महागाई भत्ता (DA) वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI-IW) ताज्या आकडेवारीनंतर याला अधिक बळ मिळाले आहे. महागाई भत्त्यात सुमारे 3 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असल्याने लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ अपेक्षित आहे.

CPI-IW आकडेवारीमुळे वाढीचा मार्ग मोकळा :

कामगार मंत्रालय (Ministry of Labour and Employment) यांनी जाहीर केलेल्या औद्योगिक ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI-IW) मे महिन्यातील आकडेवारीनुसार निर्देशांक 150.8 वर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात हा निर्देशांक 149.9 इतका होता. महागाईतील या वाढीचा थेट परिणाम महागाई भत्त्याच्या गणनेवर होत असून, त्यानुसार जुलैपासून डीएमध्ये किमान 3 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ मंजूर केली होती. आता अपेक्षित 3 टक्क्यांच्या वाढीनंतर महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. या वाढीमुळे केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

DA Hike | 8 व्या वेतन आयोगाबाबतही मोठी अपेक्षा :

दरम्यान, सरकारी कर्मचारी 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) अंमलबजावणीचीही प्रतीक्षा करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, या आयोगाच्या शिफारसी पुढील वर्षाच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने नवीन वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांना 18 ते 24 महिन्यांची थकबाकी एकरकमी मिळण्याची शक्यता आहे.

जुलै 2026 मधील महागाई भत्त्याची वाढ ही सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) नियमानुसार लागू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 8 वा वेतन आयोग लागू झाल्यास दोन्ही वेतन आयोगांतील वेतन आणि महागाई भत्त्यातील तफावत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. जुलै 2026 च्या महागाई भत्त्याची अधिकृत घोषणा ऑक्टोबर महिन्यात, दिवाळीच्या कालावधीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: DA Hike Update for Central Employees

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now