क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आज होणार IPL २०२६ चा लिलाव

On: December 16, 2025 1:56 PM
IPL 2026 Auction
---Advertisement---

IPL 2026 Auction | क्रिकेटप्रेमी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आज आला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2026 साठीचं मिनी ऑक्शन आज अबूधाबी येथे पार पडत आहे. या लिलावामध्ये देश-विदेशातील एकूण 369 क्रिकेटपटू सहभागी झाले असून, अनेक खेळाडू आज कोट्याधीश होण्याची शक्यता आहे. सर्वच फ्रँचायझी संघ आपल्या संघरचनेला अधिक मजबूत करण्यासाठी मोठ्या रणनीतीनिशी या लिलावात उतरले आहेत.

अशातच यंदाचा लिलाव विशेष ठरणार आहे, कारण काही संघांकडे मोठी पर्स उपलब्ध आहे. पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडे 43.40 कोटी रुपयांची पर्स आहे, तर तीन वेळा विजेते ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वाधिक 64.30 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे आजच्या ऑक्शनमध्ये सर्वाधिक आक्रमक बोली कोण लावणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोणते खेळाडू ठरणार ‘हॉट पिक’? :

या मिनी ऑक्शनमध्ये काही खेळाडूंवर मोठ्या बोली लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरुन ग्रीन याच्याकडे अनेक संघांचे लक्ष असून, तो सर्वाधिक महागडा खेळाडू ठरू शकतो. त्याचबरोबर इंग्लंडचा पॉवरहिटर लियाम लिव्हिंगस्टोन, भारताचा लेगस्पिनर रवी बिश्नोई आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराणा यांनाही मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. (IPL Mini Auction Live)

आयपीएल 2026 च्या पार्श्वभूमीवर संघांना ऑलराऊंडर्स, डेथ ओव्हर्समधील गोलंदाज आणि फिनिशर्सची मोठी गरज आहे. त्यामुळे या प्रकारच्या खेळाडूंवर ऑक्शनमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही अनकॅप्ड भारतीय खेळाडूही आजच्या लिलावात सर्वांना आश्चर्यचकित करू शकतात.

IPL 2026 Auction | 10 संघांमध्ये किती जागा शिल्लक? :

यंदाच्या मिनी ऑक्शनमध्ये एकूण 10 संघांमधील 77 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी 369 खेळाडू शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वाधिक 13 जागा रिक्त आहेत, तर सनरायझर्स हैदराबादकडे 10 जागा उपलब्ध आहेत. काही संघांकडे विदेशी खेळाडूंसाठी मर्यादित स्लॉट शिल्लक असल्याने त्यांना अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहेत. (IPL 2026 Auction)

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससारख्या संघांकडे कमी जागा असल्या तरी, योग्य खेळाडू मिळवण्यासाठी ते मोठी बोली लावू शकतात. एकूणच, आयपीएल 2026 च्या या मिनी ऑक्शनकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असून, प्रत्येक अपडेटसाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

News Title: IPL 2026 Mini Auction LIVE Updates: 369 Players in Auction, Who Will Get the Highest Bid?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now