आयपीएल 2025 सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम सामना ‘या’ तारखेला होणार!

On: May 13, 2025 11:58 AM
IPL 2025 New Schedule
---Advertisement---

IPL 2025 New Schedule | भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे आयपीएल 2025 स्पर्धा थांबवण्यात आली होती. पण आता परिस्थिती पूर्ववत झाल्याने बीसीसीआयने स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी होणार असून, उर्वरित 17 सामने 17 मेपासून खेळवले जाणार आहेत. (IPL 2025 New Schedule)

8 मे रोजी पंजाब किंग्ज व दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सुरू असलेला सामना अर्धवट थांबवण्यात आला होता. त्यानंतर स्पर्धा स्थगित झाली. पण आता बीसीसीआयने सुधारित वेळापत्रक जाहीर करत, उर्वरित सामन्यांची रूपरेषा स्पष्ट केली आहे. या सामन्यांमुळे प्लेऑफसह अंतिम टप्प्याचे उत्साहात आयोजन होणार आहे.

सहा ठिकाणी उर्वरित सामने; दोन डबल हेडर्स :

बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, उर्वरित सामने बंगळुरू, दिल्ली, लखनौ, मुंबई, अहमदाबाद आणि जयपूर या सहा ठिकाणी पार पडणार आहेत. या सामन्यांमध्ये दोन डबल हेडर (रविवारी दोन सामने) असणार आहेत. यासह 58 वा सामना पुन्हा होणार असून, 24 मे रोजी जयपूरमध्ये पंजाब आणि दिल्ली आमनेसामने येणार आहेत.

बीसीसीआयने या निर्णयासोबत भारतीय सशस्त्र दलांच्या योगदानाचे कौतुक करत, त्यांच्या प्रयत्नांमुळे क्रिकेटचे सुरळीत पुनरागमन शक्य झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. स्पर्धेचे वातावरण पुन्हा निर्माण होणार असून, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

IPL 2025 New Schedule | प्लेऑफ आणि अंतिम फेरीचे वेळापत्रक :

उर्वरित सामन्यांनंतर प्लेऑफ फेरीसाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे: ((IPL 2025 New Schedule))

क्वालिफायर 1: 29 मे
एलिमिनेटर: 30 मे
क्वालिफायर 2: 1 जून
अंतिम सामना: 3 जून

17 मे ते 27 मे दरम्यान सामन्यांमध्ये स्पर्धेतील चित्र स्पष्ट होणार आहे. प्रत्येक संघासाठी ही सामन्ये महत्त्वाची असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक दिवस उत्कंठावर्धक ठरणार आहे.

News Title: IPL 2025 Revised Schedule Announced: Final on June 3, Matches Resume from May 17

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now