IPL 2025 | आयपीएल 2025 मध्ये रविवारी झालेल्या सामन्यांनंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. आरसीबीने (RCB) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव करत पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावलं आहे, तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. (IPL 2025)
RCB अव्वल स्थानी
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या 46व्या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेट्सनी पराभूत केलं. या विजयामुळे आरसीबीने 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. घराबाहेरील सलग सहावा विजय मिळवणाऱ्या आरसीबीने दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा संघ घसरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्लीने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि त्यांचा हा तिसरा पराभव ठरला आहे.
रविवारी लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) पराभव करत मुंबई इंडियन्सने 12 गुणांसह तिसरं स्थान पटकावलं आहे. लखनऊचा हा पाचवा पराभव असून ते सहाव्या स्थानावर घसरले आहेत. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) नेट रन रेटच्या जोरावर दुसऱ्या स्थानावर आहे.
तर पंजाब किंग्स (Punjab Kings) संघ 9 पैकी 5 सामने जिंकून पाचव्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यावर 11 गुण आहेत. लखनऊ सुपर जायंट्सने 10 पैकी 5 सामने जिंकले असून पाच सामने गमावले आहेत आणि ते सहाव्या स्थानावर आहेत.
तळाचे चार संघ कोणते?
- सातवे स्थान: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) – 9 पैकी 3 विजय, 1 सामना अनिर्णित
- आठवे स्थान: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) – 9 पैकी 3 विजय
- नववे स्थान: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) – 9 पैकी 2 विजय
- दहावे स्थान: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) – 9 पैकी 2 विजय
प्लेऑफसाठी अव्वल चार संघ पात्र ठरणार असून सरासरी सात ते आठ सामने जिंकणं आवश्यक आहे. सध्याच्या घडामोडी पाहता आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Title : IPL 2025 Points Table RCB Tops, Mumbai Climbs to Third






