IPL 2025 उद्घाटन सोहळा, दिशा पाटणी, श्रेया घोषालसह प्रसिद्ध कलाकार लावणार चार चाँद

On: March 22, 2025 8:16 AM
IPL 2025
---Advertisement---

IPL 2025 Opening Ceremony | आयपीएल 2025 चा थरार सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असून, या हंगामाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 22 मार्च रोजी कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर हा सोहळा पार पडणार असून, देशातील आणि परदेशातील लोकप्रिय कलाकार यात सादरीकरण करणार आहेत. (IPL 2025 Opening Ceremony)

उद्घाटन सोहळ्याचे संपूर्ण तपशील

IPL 2025 चा प्रारंभ 22 मार्च रोजी कोलकात्यात होणार असून, सलामीचा सामना यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. पण या सामन्याआधी एक भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे, ज्यात अनेक नामवंत कलाकार आपली कला सादर करतील.

या वर्षीचा उद्घाटन सोहळा कोलकात्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवर सायंकाळी 6 वाजता सुरू होईल. या सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी, प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि पंजाबी गायक करण औलिजा सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर लगेच सलामीचा सामना सुरू होईल.

IPL 2025 साठी संघांमध्ये लिलावानंतर मोठ्या प्रमाणावर बदल झाले असून पाच संघांचे कर्णधारही बदलले आहेत. कोलकात्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी आता अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर देण्यात आली आहे, तर श्रेयस अय्यर आता पंजाब किंग्जकडून संघाचं नेतृत्व करणार आहे. दिल्लीने अक्षर पटेलला नवा कर्णधार नियुक्त केला आहे.

कुठे आणि कधी पाहता येईल हा सोहळा?

IPL चा उद्घाटन सोहळा सर्व चाहत्यांसाठी स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर थेट प्रसारित केला जाणार आहे. याशिवाय, ऑनलाईन प्रेक्षक जिओ सिनेमा आणि हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर देखील हा सोहळा पाहू शकतील. एक लाख प्रेक्षक सामावणाऱ्या इडन गार्डन्स मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Title : IPL 2025 Opening Ceremony Venue details 

 

Join WhatsApp Group

Join Now