IPL 2025 Final | आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याचा महासंग्राम आज संध्याकाळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi stadium) पार पडणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे दोन्ही संघ जेतेपदासाठी सज्ज झाले असून, त्यांचा हा पहिलाच फायनल सामना आहे. मात्र सामन्याआधी टॉस, पिच आणि याआधीच्या आकडेवारीकडे पाहिलं तर सामना रंगतदार होणार हे नक्की.
मोदी स्टेडियम पिच रिपोर्ट :
नरेंद्र मोदी स्टेडियमची पिच ही तुलनात्मकदृष्ट्या फलंदाजांसाठी पोषक मानली जाते. क्वॉलिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सने 203 धावा केल्या होत्या आणि पंजाबने त्या सहज गाठत विजय मिळवला. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं या मैदानावर सहज शक्य आहे. (IPL 2025 Final)
2025 च्या हंगामात या मैदानावर 8 सामने झाले, त्यातील 6 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. मात्र पंजाबनेच याच मैदानावर 204 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण केला होता!
IPL 2025 Final | मोदी स्टेडियम IPL रेकॉर्ड :
एकूण IPL सामने: 43
प्रथम फलंदाजी करून विजय: 21
दुसऱ्या डावात फलंदाजी करून विजय: 22
सर्वाधिक स्कोअर: 243 धावा
सर्वात कमी स्कोअर: 89 धावा
ही आकडेवारी सांगते की टॉस जिंकून काय निर्णय घ्यायचा याबाबत परिस्थितीनुसार रणनीती बदलू शकते.
टॉस किती महत्त्वाचा? :
अनेकदा असे म्हटले जाते की मोठ्या सामन्यांमध्ये टॉस निर्णायक ठरतो. परंतु मोदी स्टेडियमवरील आकडेवारी पाहता – टॉस जिंकणं फायदेशीर असलं तरी गेम फिरवण्याची क्षमता दोन्ही संघांमध्ये आहे. पिचवर भरपूर धावा होत असल्याने नाणेफेकपेक्षा खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरणार आहे. (IPL 2025 Final)
संभाव्य प्लेइंग 11 :
पंजाब किंग्स XI:
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जॉश इंग्लिस (wk), श्रेयस अय्यर (कॅप्टन), नेहाल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टॉयनिस, अज़मत ओमरज़ाई, विजयकुमार वैशक, काईल जेमिसन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल/हरप्रीत बरार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू XI:
फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कॅप्टन), लिविंगस्टन/टिम डेविड, जितेश शर्मा (wk), रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जॉश हेजलवुड, सुयश शर्मा






