धोनीच्या टीमचे प्लेऑफचे स्वप्न भंगले, पंजाबने मारली मोठी झेप

On: May 1, 2025 11:59 AM
CSK
---Advertisement---

IPL 2025 Points Table | अखेर तो क्षण आला, जो चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) चाहत्यांना नकोसा होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज (PBKS) संघाने महत्त्वाचा विजय मिळवत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे आणि आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (IPL 2025 Points Table)

पंजाबने चेन्नईला हरवत 13 गुणांची कमाई केली असून, संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला नसता, तर ते अजूनही टॉपवर असते. चेन्नईसाठी मात्र यंदाची मोहीम संपुष्टात आली आहे.

पॉइंट टेबलमधील मोठे बदल :

पंजाबच्या विजयामुळे आयपीएल 2025 च्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत. (IPL 2025 Points Table)

– RCB अजूनही अव्वल स्थानावर असून त्यांचे 14 गुण आहेत.
– PBKS दुसऱ्या स्थानावर (13 गुण)
– MI, GT आणि DC या तीन संघांचे 12 गुण असून नेट रनरेटच्या आधारे मुंबई तिसऱ्या, गुजरात चौथ्या आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहेत.
– LSG संघाचे 10 गुण असून ते सहाव्या स्थानावर आहे.
– KKR चे 9 गुण असून त्यांच्या शर्यतीस अजूनही जीव आहे.

IPL 2025 Points Table | राजस्थान व हैदराबाद अजूनही मैदानात :

राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांचे प्रत्येकी 6 गुण असून ते अजूनही प्लेऑफच्या रेषेवर आहेत. मात्र, या संघांनी आणखी एक सामना गमावल्यास त्यांची प्लेऑफची आशा संपुष्टात येईल. (IPL 2025 Points Table)

आज (1 मे) जयपूरमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा थरारक सामना रंगणार आहे. हा सामना या दोन्ही संघांच्या भवितव्यावर निर्णायक ठरणार आहे.

News Title: IPL 2025: CSK Knocked Out of Playoffs Race, Punjab Kings Jump to 2nd Spot After Crucial Win

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now