आजपासून IPL चा रणसंग्राम! अशाप्रकारे पाहा फ्रीमध्ये लाईव्ह सामने

On: March 22, 2025 9:16 AM
IPL 2025
---Advertisement---

IPL 2025 l जगप्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल 2025 आजपासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तब्बल 74 सामन्यांची ही स्पर्धा दोन महिने चालणार असून संपूर्ण देशभरातील क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा टी-20 चा थरार अनुभवता येणार आहे.

10 संघ, 13 स्टेडियम आणि 12 डबल हेडर्स – अशा भव्य स्वरूपात यंदाची स्पर्धा रंगणार आहे. 22 मार्च ते 25 मे 2025 या कालावधीत हे सामने पार पडणार असून, यातील अनेक सामने शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी डबल हेडर स्वरूपात असतील.

आयपीएल 2025 सामने फ्रीमध्ये कुठे पाहता येतील? :

आयपीएल 2025 चे टीव्ही ब्रॉडकास्टिंग हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे असून, प्रेक्षक हिंदी, इंग्रजीसह मराठीत सुद्धा सामना पाहू शकतील. मात्र, डिजिटल हक्क जिओ हॉटस्टारकडे असल्याने मोबाइल किंवा लॅपटॉपवर सामना पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन आवश्यक आहे.

पण चांगली बातमी म्हणजे – जिओ, एअरटेल आणि Vi कंपन्यांनी काही खास रिचार्ज प्लान्स तयार केले आहेत, जे घेतल्यास तुम्हाला फ्रीमध्ये जिओ हॉटस्टारवर IPL 2025 चे सामने पाहता येणार आहेत. उदाहरणार्थ, जिओच्या ₹100 प्रीपेड प्लानमध्ये 5GB डेटा आणि हॉटस्टारचा फ्री अ‍ॅक्सेस मिळतो.

IPL 2025 l ओपनिंग सेरेमनीत स्टार्सचा जलवा :

IPL 2025 ची ओपनिंग सेरेमनी सायंकाळी 6 वाजता सुरू होणार असून त्यात श्रेया घोषाल, दिशा पाटनी, करण औजला यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. हा सोहळा स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टारवर थेट पाहता येणार आहे.

सामन्यांचे वेळापत्रकानुसार, संध्याकाळचे सामने 7:30 वाजता, तर डबल हेडरचे दुपारचे सामने 3:30 वाजता खेळवले जातील. टॉस अनुक्रमे अर्धा तास आधी पार पडेल.

News Title: IPL 2025 Begins Today – Here’s How to Watch All Matches Live for FREE

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now