केकेआरचा दणदणीत विजय; जाणून घ्या कोणाला किती रुपये मिळाले

On: May 27, 2024 8:19 AM
IPL 2024 Final Prize Money KKR vs SRH
---Advertisement---

KKR Win l आयपीएल 2024 चा हंगाम संपला आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात केकेआरने हैदराबादचे आठ गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने 2014 च्या मोसमात अखेरचे विजेतेपद पटकावले होते आणि 10 वर्षांनंतर अखेर जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात संघाला यश आले होते.

यंदाचा IPL पुरस्कार सोहळा होता काही खास :

मात्र यंदाच्या वर्षी पुरस्कार सोहळा काही खास होता. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्यांदाच खेळपट्टी आणि मैदान पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमने हा पुरस्कार जिंकला आणि बक्षीस म्हणून 50 लाख रुपये मिळाले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सने फायनल सामना जिंकून तब्बल 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. जगभरात खेळल्या जाणाऱ्या विविध T20 लीगमध्ये ही सर्वाधिक बक्षीस रक्कम आहे. त्याचबरोबर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 15.5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर आयपीएल 2024 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येकी 7 कोटी रुपये दिले जातील.

KKR Win l IPL 2024 मध्ये कोणता पुरस्कार कोणाला मिळाला? :

विजेता संघ- 20 कोटी रुपये (कोलकाता)
उपविजेता संघ- 15.5 कोटी रुपये (हैदराबाद)
तिसऱ्या स्थानावर असलेला संघ- 7 कोटी रुपये (राजस्थान)
चौथ्या स्थानावर असलेला संघ- 6.5 कोटी रुपये (बंगळुरु)
इमर्जिंग प्लेअर पुरस्कार – नितीशकुमार रेड्डी (हैदराबाद), 20 लाख रुपये
इलेक्ट्रिक स्ट्राईकर ऑफ द सिझन पुरस्कार – जेक फ्रेझर मॅकगर्क (दिल्ली)
फॅन्टसी प्लेअर ऑफ द सिझन पुरस्कार – सुनील नरेश (कोलकाता)

सुपर सिक्सेस ऑफ द सिझन पुरस्कार- अभिषेक शर्मा (हैदराबाद)
सर्वाधिक चौकार पुरस्कार- ट्रॅव्हिस हेड (हैदराबाद)
कॅच ऑफ द सिझन- रमणदीप सिंग (कोलकाता)
फेअरप्ले अवॉर्ड पुरस्कार- हैदराबाद
ऑरेंज कॅप पुरस्कार- विराट कोहली (741 धावा, बंगळुरु), 15 लाख रुपये
पर्पल कॅप पुरस्कार- हर्षल पटेल (24 विकेट्स, पंजाब), 15 लाख रुपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर पुरस्कार- 12 (सुनील नरेन, कोलकाता), 12 लाख रुपये

News Title – IPL 2024 Final Prize Money KKR vs SRH

महत्त्वाच्या बातम्या

या राशीच्या व्यक्तींनी जमिनीच्या वादात पडू नका

शरद पवारांना धक्का; दिल्लीतील बड्या नेत्याने सोडली साथ?

दुपारपर्यंत उष्णतेनं अंगाची लाहीलाही; संध्याकाळी पावसाचा धिंगाणा

राज्यातील ‘या’ भागात येत्या 24 तासात मान्सूनची हजेरी

रितेश देशमुखने उलगडलं विलासरावांचं राजकीय गणित; थेट म्हणाला..

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now