Russell & Ananya Panday Dance l कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंचा आणि चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू, आणि संघाशी संबंधित लोकांचे क्लब व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंसोबत दिसत आहे. सोशल मीडियावर अनन्या पांडेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
अनन्या पांडेचा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल :
या व्हिडीओमध्ये अनन्या पांडे आणि कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू आणि अनन्या पांडे व्यतिरिक्त चंद्रकांत पंडित जोरदार डान्स करत आहेत. मात्र, अनन्या पांडेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत. अनन्या पांडे सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला हरवून तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादचा संघ 18.3 षटकांत सर्वबाद 113 धावांवर आटोपला. याला प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने अवघ्या 10.3 षटकांत 2 गडी राखून लक्ष्य गाठले आहे.
Andre Russell enjoying "Lutt Putt Gaya" Song during the IPL winning Party. ???????? pic.twitter.com/Q8sg53FuFi
— Johns. (@CricCrazyJohns) May 27, 2024
Russell & Ananya Panday Dance l व्हिडीओमध्ये काय आहे? :
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनन्या पांडे आणि कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू मनसोक्त डान्स करताना दिसून येत आहे. कोलकाताच्या या खेळाडूंसोबत प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी देखील जोरदार डान्स केला आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडीओमध्ये अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि अनन्या पांडे शाहरुख खानच्या चित्रपटातील लूट-पूट गया…या गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसत आहेत.
याशिवाय कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर शाहरुख खान आणि KKR च्या खेळाडूंनी ‘फ्लाईंग किस’ देऊन जोरदार आनंद साजरा केला आहे. या पोझची या सीझनमध्ये प्रचंड चर्चा झाली आहे.
News Title – IPL 2024 Final Andre Russell Dances With Ananya Panday
महत्त्वाच्या बातम्या
हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाबाबत मोठी माहिती समोर
अजितदादानंतर आता पाण्यावरून भाजप नेत्याचे विधान, “मी काय फूक मारून…”
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तवला अंदाज






