iPhone 16 Offer l जर तुम्ही ॲपल प्रेमी असाल आणि तुम्हाला iPhone 16 खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Reliance Digital ने एक ऑफर लाँच केली आहे. तुम्ही Reliance Digital मध्ये कमी किमतीत iPhone 16 खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला बँक डिस्काउंट आणि N0-Cost EMI चाही लाभ मिळणार आहे.
आयफोन 16 वर मिळतेय भरघोस सूट :
आयफोन 16 सिरीज 9 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर लाँच करण्यात आली. iPhone 16 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये असली तरी रिलायन्स डिजिटलवर 5,000 रुपयांची झटपट सूट मिळत आहे. तसेच तुमच्याकडे आयसीआयसीआय, एसबीआय, कोटक बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास तुम्ही 5,000 रुपयांची झटपट सूट मिळवण्यासाठी ते वापरू शकता. मात्र त्यानंतर या फोनची किंमत 74,900 रुपये होईल.
याशिवाय येथे नो-कॉस्ट ईएमआय पर्यायही उपलब्ध आहे. जर तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय मिळत असेल तर तुम्हाला 6 महिन्यांसाठी दरमहा 12,483 रुपये द्यावे लागतील. iPhone 16 Plus मध्ये, कंपनीने 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले, डायनॅमिक आयलंड दिला आहे. या फोनमध्ये प्रोसेसरसाठी Apple A18 चिपसेट देण्यात आला आहे.
iPhone 16 Offer l 5 रंगांमध्ये उपल्बध :
तसेच हा फोन iOS 18 वर आधारित सॉफ्टवेअरवर चालतो. हा फोन 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज सह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये ॲक्शन बटण, ॲपल इंटेलिजेंस आणि कॅमेरा कंट्रोल बटण यांसारखी अनेक खास फीचर्स देण्यात आली आहेत. कंपनीने हा फोन एकूण 5 रंगांमध्ये लाँच केला आहे.
यामध्ये काळ्या, पांढऱ्या, गुलाबी, टील आणि अल्ट्रामॅरिन रंगात हा फोन मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये Li-ion, MagSafe, Qi2, Qi वायरलेस चार्जिंग आणि USB Type-C वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
News Title – iPhone 16 Diwali Offer
महत्वाच्या बातम्या-
यादी तयार! रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 मोठे नेते पाडणार; कोणी दिला इशारा?
मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी, इच्छुक उमेदवारांनी ‘असा’ करावा अर्ज!
‘या’ बड्या नेत्याला घेण्यासाठी जाताना कोसळलं हेलिकॉप्टर; तीन जणांचा मृत्यू
ब्रेकिंग! पुण्यातील ‘या’ भागात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू
सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?






