Investors Alert | शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयसीआयसीआय प्रुडेंशियल एएमसीचे (ICICI Prudential AMC) चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर (Chief Investment Officer – CIO) एस. नरेन (S. Naren) यांनी मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समधील गुंतवणुकीसंदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, सध्या या कंपन्यांमधून पैसे काढून घेणे अधिक फायदेशीर ठरू शकते. (Investors Alert)
मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक धोक्याची:
नुकत्याच झालेल्या IFA Galaxy 2025 परिषदेत बोलताना नरेन यांनी सांगितले की, मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक मोठ्या जोखमीची ठरू शकते. त्यांच्या मते, हे शेअर्स सध्या खूप महाग झाले असून, बाजारात मोठी अस्थिरता (Volatility) येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअर्समधून पैसे काढणे अधिक सुरक्षित ठरेल.
गुंतवणूकदारांसाठी 2025 हे वर्ष धोकादायक:
नरेन यांच्या मते, 2008-2010 नंतर 2025 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक धोकादायक असू शकते. पूर्वी बँका (Banks) आणि मोठ्या कंपन्या (Companies) जोखीम घेत होत्या, मात्र आता गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात पैसे गुंतवत आहेत. अनेक कंपन्या बँकांकडून कर्ज घेण्याऐवजी गुंतवणूकदारांकडून थेट पैसे उभे करत आहेत. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता येण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीसाठी एसआयपी (SIP) उत्तम पर्याय मानला जातो. मात्र, नरेन यांच्या मते, एसआयपीमधूनही यावेळी चांगले रिटर्न मिळतीलच याची खात्री नाही. त्यांनी स्पष्ट केले की, एसआयपी फक्त अस्थिर आणि कमी किमतीच्या मार्केटसाठी (Market) उपयुक्त असतो. सध्या मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्सचे पी/ई रेशो (P/E Ratio) 43x वर पोहोचला असून, जो बाजारातील अस्थिरता दर्शवतो. (Investors Alert)
नरेन यांनी मिड आणि स्मॉल-कॅपमधील एसआयपीपेक्षा हायब्रिड फंड्स निवडण्याचा सल्ला दिला आहे. जर बाजाराबद्दल सकारात्मक दृष्टिकोन (Positive Outlook) असेल, तर इक्विटी-डेट हायब्रिड फंड (Equity-Debt Hybrid Fund) हा उत्तम पर्याय आहे. कमी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मल्टी-ॲसेट फंड (Multi-Asset Fund), विशेषतः सोने असलेले फंड (Gold Funds) अधिक चांगले पर्याय ठरू शकतात.
Title : Investors Alert ICICI Pru AMC CIO Warns of Risks in Mid and Small-Cap Stocks






