वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, धक्कादायक माहिती आली समोर

On: May 30, 2024 9:48 PM
IND Vs PAK
---Advertisement---

INDvPAK | इंडिया विरूद्ध पाकिस्तान (INDvPAK) यांच्यात हायप्रोफाईल सामना होणार आहे. हा सामना येत्या 9 जून रोजी होणार आहे. या दोन्ही संघातील लढत ही ऐतिहासिक लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंड येथील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियममधील सुरक्षेबाबत आता चिंता वाढली आहे. (INDvPAK)

वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट

या सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सामन्यात दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा तैनात करण्यात येईल. या सामन्यात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. या सामन्यासाठी मैदानापासून हायवेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. (INDvPAK)

वास्तविक अहवालानुसार मिळालेली माहिती, (इस्लामिक स्टेट खोरासान) ने ‘लोन वुल्फ’ हल्ल्याबद्दल भाष्य केलं. यावेळी ISIS कडून व्हिडीओ जारी करण्यात आला. त्यात नासाऊ काउंटीचे पोलीस पॅट्रिक रायडर यांनी धमकीची पुष्टी केली आहे. (INDvPAK)

न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हाॅचुल यांनीही भारत-पाकिस्तान सामन्याच्या सुरक्षेबाबत सांगितले, सामना सुरळित पार पाडावा. यासाठी त्या सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत त्या जवळीकता बाळगून काम करत असताना दिसतायेत.

कॅथी हॉचुल यांनी ट्विट करत एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीसाठी सामन्याला उपस्थित असलेल्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी माझी टिम फेडरेल आणि कायदेशीर काम करत आहे. यावेळी कोणताही विश्वासार्ह धोका नसला तरीही मी NYPD ला सुरक्षा उपाय वाढवण्यासाठीचे निर्देश दिले आहेत.

सुरक्षारक्षक तैनात होणार

इंडिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात हायप्रोफाईल सामना होणार आहे. हा सामना येत्या 9 जून रोजी होणार आहे. या सामन्यावेळी भीतीचं सावट आहे. यामुळे आता या स्पर्धेला सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैणात करण्यात येणार आहेत याबाबत सविस्तर माहिती समोर आली. न्यूयॉर्कच्या हायझेनहॉवर पार्क सकाळी 6.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहिल. चाहते निघून गेल्यावर पोलीस पुन्हा परिसर उघडतील.

हायझेनहॉवर पार्क येथील पार्किंग ही व्हिआयपी तिकीटधारकांसाठी असेल, इतर प्रेक्षक थोड्या अंतरावर असलेल्या नासाऊ कोलिझियमजवळ पार्किंग करतील.

News Title – INDvPAK T20 World Cup Match Terror Threat By ISIS

महत्त्वाच्या बातम्या

Biwi No: 1 सिनेमा गोविंदाने का सोडला?, 25 वर्षांनंतर समोर आलं धक्कादायक कारण

किंग खानला हरवून दीपिका पदुकोण बनली ‘क्वीन’! पाहा IMDb Top लिस्ट

शिक्षक व पदवीधर निवडणुक नेमकी कधी? तर आचार संहिता कधी लागू होणार; जाणून घ्या A टू Z माहिती

पोर्शे कार अपघात प्रकरणात आणखी एक व्यक्तीची एन्ट्री;…आता असं घडण्याची दाट शक्यता

मोठी बातमी! अंदाधुंद गोळीबारात माजी नगरसेवकाचा जागीच मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Join WhatsApp Group

Join Now