Diplomatic Strike l जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Attack) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध करत आता थेट कारवाईची भूमिका घेतली आहे. 28 निष्पाप नागरिकांच्या हत्येनंतर भारताने पाकिस्तानवर एकामागून एक निर्णय घेत, राजनैतिक आणि धोरणात्मक पातळीवर स्ट्राईक केला आहे. एकाही गोळीशिवाय पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द केला, अटारी पोस्ट बंद केली, पाक नागरिकांसाठी व्हिसावर बंदी घातली आणि राजनैतिक सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व निर्णयांचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खोल परिणाम होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची तातडीने बैठक झाली. यामध्ये भारताने पाकिस्तानविरोधात 5 निर्णायक पावलं उचलली. भारत आता केवळ निषेध करणार नाही, तर कृतीतून प्रत्युत्तर देईल, हे स्पष्ट करण्यात आलं. डिप्लोमॅटिक स्ट्राईकच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला एकाकी पाडण्याची रणनीती राबवली आहे.
सिंधू पाणी करार रद्द; पाकिस्तानच्या शेतीला मोठा फटका :
भारताने सर्वात मोठा निर्णय घेत सिंधू पाणी करार रद्द केला आहे. हा करार गेल्या 60 वर्षांपासून भारत-पाकिस्तानमध्ये अस्तित्वात होता. पाकिस्तानमधील 80% शेती सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर आधारित आहे. भारताने पाणी रोखल्यास, पाकिस्तानमध्ये शेती आणि वीज निर्मिती दोन्हीवर गंभीर परिणाम (Pakistan Economy Crisis) होणार आहेत. पाण्याची आणि वीजेची तीव्र टंचाई निर्माण होऊन आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Diplomatic Strike l अटारी पोस्ट बंद आणि व्हिसावर बंदी; संबंध पूर्णपणे खंडित :
दुसरा मोठा निर्णय म्हणजे अटारी पोस्ट बंद करणे. यामुळे लहान व्यापाऱ्यांमध्ये होणारे व्यवहार पूर्णपणे थांबणार आहेत. तिसऱ्या निर्णयाअंतर्गत भारताने सार्क व्हिसा योजना रद्द केली असून, सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारतातून 48 तासांत बाहेर जाण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यामुळे मानवतेच्या आधारावर होणारे संपर्कही पूर्णपणे थांबतील. (India’s Diplomatic Strike on Pakistan)
लष्करी सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश :
भारताने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील लष्कर, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश दिले असून, त्याचवेळी भारताने इस्लामाबादमधील आपल्या सल्लागारांनाही परत बोलावलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी आणि राजनैतिक संवाद पूर्णपणे खंडित झाला आहे.








