India Post Recruitment | भारतीय टपाल विभागात (India Post) लवकरच मोठी भरती होणार आहे. पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक (जीडीएस), मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस), सहाय्यक अधीक्षक यांसारख्या पदांसाठी तब्बल २१,४१३ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवार ३ ते २८ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.
पदांचा तपशील आणि अर्ज प्रक्रिया
या मेगाभरतीमध्ये विविध पदांचा समावेश आहे. उमेदवार टपाल विभागाचे अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन (Online) असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ मार्च आहे. बेरोजगारीच्या काळात ही भरती तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य आहेत. उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असून, संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. (India Post Recruitment)
महाराष्ट्रातील जागा आणि इतर राज्यांतील पदे
ही भरती संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सुमारे १५०० जागा भरल्या जाणार आहेत. इतर राज्यांमध्ये उत्तरप्रदेश – ३००४, ओडिशा – ११०१, तामिळनाडू – २२९२, कर्नाटक – ११३५, आसाम – १८७०, गुजरात – १२०३, आंध्रप्रदेश – १२१५, पश्चिमबंगाल – ९२३, बिहार – ७८३, छत्तीसगड – ६३८, झारखंड – ८२२, पंजाब – ४००, हिमाचलप्रदेश – ३३१ जागांचा समावेश आहे.
निवड प्रक्रिया, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
उमेदवारांची निवड गुणवत्तेवर आधारित असेल आणि कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे पूर्ण आणि कमाल ४० वर्षांपर्यंत असावे. आरक्षित वर्गाला नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.
एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षांची, ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षांची, तर दिव्यांग उमेदवारांसाठी १० वर्षांची सूट देण्यात आली आहे. अर्ज शुल्क १०० रुपये असून, एससी/एसटी/महिला/दिव्यांगांना शुल्क माफ आहे. (India Post Recruitment)
News Title : India Post Recruitment for 21,413 Posts






