India-Pakistan tension | भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानकडून निषेध आणि प्रत्युत्तराच्या कारवाया सुरू आहेत. मात्र, भारतीय संरक्षण दलाच्या मजबूत सुरक्षा कवचापुढे पाकिस्तानचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. पाकिस्तानने एकापाठोपाठ अनेक ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, पण भारताने त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाचा यशस्वीरित्या नायनाट केला आहे.
पाकिस्तान ड्रोन हल्ले
८ आणि ९ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानी सशस्त्र दलांनी संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर करून अनेक हल्ले चढवले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र, यावेळी भारताने हे सर्व ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावले आणि त्यांच्या आगळीकीला योग्य आणि सडेतोड उत्तर दिले, अशी माहिती भारतीय सैन्यदलाने एक व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली आहे.
भारतीय सैन्य देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे नमूद करत सैन्यदलाने पाकिस्तानच्या सर्व नापाक योजनांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, याची खात्री दिली आहे. अवघ्या १४ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये ड्रोन, अचूक लक्ष्यभेद आणि त्यानंतर होणारा मोठा स्फोट यांसारखी दृश्ये पाहायला मिळत आहेत.
उधमपूर हल्ला फसला
भारतीय लष्कराने पाकिस्तानवरील ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ जारी करून पाकिस्तानचे ड्रोन पाडल्याचा ठोस पुरावा संपूर्ण देशासमोर सादर केला आहे. हे केवळ एक उदाहरण आहे, याव्यतिरिक्त भारताने पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांचे अनेक कट उधळून लावले आहेत. केवळ जम्मू-काश्मीरच्या सीमाभागातच नव्हे, तर कच्छ सीमेवरही भारताने पाकिस्तानचे ३ ड्रोन पाडले आहेत. सर क्रीक परिसरातही ड्रोन दिसले, त्यानंतर देशाच्या पश्चिम सीमेवर तातडीने अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष शोधण्यासाठी संपूर्ण जम्मू भागात मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली असून, सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहेत. इतके मोठे नुकसान होऊनही पाकिस्तानने यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही आणि ते अजूनही कुरापती करत असल्याचे दिसून येत आहे. ९ मे २०२५ रोजी, शुक्रवारी, उधमपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनने नॉर्दर्न कमांडच्या लष्करी सुविधा आणि परिसरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळीही सर्व ड्रोन यशस्वीरित्या रोखण्यात आले आणि त्यांना तत्काळ पाडण्यात आले.
OPERATION SINDOOR
Pakistan Armed Forces launched multiple attacks using drones and other munitions along entire Western Border on the intervening night of 08 and 09 May 2025. Pak troops also resorted to numerous cease fire violations (CFVs) along the Line of Control in Jammu and… pic.twitter.com/WTdg1ahIZp
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 9, 2025
Title : 14 Seconds, Accurate Aim, and Blast! Indian Army Releases Drone Attack Video






