भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट! सामना रद्द झाल्यास ‘या’ संघाला होणार फायदा

On: February 15, 2026 12:11 PM
Ind vs Pak
---Advertisement---

Ind vs Pak | कोलंबोमध्ये आज रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी हवामानानेच सर्वांचे लक्ष वेधले आहे. सकाळी क्षणभर सूर्यप्रकाश दिसला असला तरी नंतर पुन्हा आकाशात दाट ढग जमा झाले. त्यामुळे आयसीसी टी20 विश्वचषक 2026 मधील या महत्त्वाच्या लढतीवर पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सामना रद्द झाल्यास गुणतालिकेवर काय परिणाम होईल, याबाबतही चर्चा सुरू आहे. (T20 World Cup 2026)

सामन्याचे ठिकाण, वेळ आणि हवामान अंदाज :

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 World Cup 2026) स्पर्धेतील साखळी फेरीतील तिसऱ्या लढतीत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवार, 15 फेब्रुवारी रोजी आमनेसामने येणार आहेत. हा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे असलेल्या आर. प्रेमदासा स्टेडियम (R. Premadasa Stadium) मध्ये संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंका हे या स्पर्धेचे संयुक्त यजमान असले तरी पाकिस्तानला भारतात खेळण्यासाठी परवानगी न मिळाल्याने ही लढत श्रीलंकेत आयोजित करण्यात आली आहे. टीम इंडिया शनिवारी पहाटे श्रीलंकेत पोहोचली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार सामन्यादरम्यान सुमारे 65 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून दुपारनंतर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तरीदेखील सायंकाळी 7 वाजेपर्यंतही सुमारे 50 टक्के पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Ind vs Pak | सामना रद्द झाल्यास समीकरणे काय? :

हा सामना 20 षटकांचा असल्याने अधिकृत निकालासाठी दोन्ही संघांनी किमान 5-5 षटके खेळणे आवश्यक आहे. जर पावसामुळे तेवढाही खेळ होऊ शकला नाही, तर सामना रद्द घोषित केला जाईल. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल आणि त्यांचे एकूण गुण पाच-पाच होतील. गुणतालिकेत मोठा फरक पडणार नसला तरी पुढील सामन्यांचे महत्त्व वाढेल.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ए गटात असून त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या दोनपैकी दोन्ही सामने जिंकले आहेत. मात्र पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा नेट रनरेट अधिक चांगला असल्यामुळे टीम इंडिया सध्या अव्वल स्थानावर आहे. (Ind vs Pak Live)

मात्र सामना पावसामुळे रद्द झाला तरी सुपर 8 फेरीत प्रवेशासाठी दोन्ही संघांना शेवटचा साखळी सामना जिंकणे गरजेचे राहील. भारताचा पुढील सामना नेदरलँड्सविरुद्ध, तर पाकिस्तान नामिबियाशी भिडणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यासाठी राखीव दिवसाची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

News Title: Ind Pak Match Rain Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now