पुणे शहरातील बस स्थानकांवर अपुरी सुरक्षा व्यवस्था; अत्याचाराच्या घटना वाढल्या

On: February 27, 2025 9:45 AM
Pune News
---Advertisement---

Pune Bus Station l पुण्यातील स्वारगेट (Swargate), छत्रपती शिवाजीनगर (Chhatrapati Shivajinagar) आणि पुणे स्टेशन (Pune Station) या तीन महत्त्वाच्या बस स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून फक्त ४८ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ४६ सुरक्षारक्षक आहेत, जे वाढत्या गर्दीच्या आणि गुन्हेगारी घटनांच्या तुलनेत अत्यंत अपुरे आहेत. मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर झालेल्या बलात्कारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षकांची कमतरता :

एसटी प्रशासनाकडून (ST Administration) मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही बस स्थानकांवर २४ तास सुरक्षारक्षक तैनात असतात आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मात्र, बसस्थानकांचा विस्तार आणि प्रवाशांची संख्या पाहता, हे सुरक्षा उपाय अपुरे आहेत.

दररोज लाखो प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करतात. त्यात महिला प्रवाशांची संख्याही मोठी आहे. बसस्थानकांवर मोबाईल चोरी, पाकीटमारी आणि मौल्यवान वस्तूंची चोरी यांसारख्या घटना वारंवार घडत आहेत. राज्य सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात सवलत जाहीर केल्यामुळे, बसने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा घेऊन चोरटे प्रवाशांना लक्ष्य करत आहेत.

प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लूटमार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. स्वारगेट बसस्थानकात दररोज जवळपास १ हजार बसची ये-जा असते आणि दिवसाला ४० ते ५० हजार नागरिक प्रवास करतात, पण सुरक्षेसाठी केवळ २२ सुरक्षारक्षक आहेत. छत्रपती शिवाजीनगर येथे १७ आणि पुणे स्टेशनवर फक्त ७ सुरक्षारक्षक आहेत.

Pune Bus Station l प्रशासनाकडून दुर्लक्ष, रिक्षा स्टँडचा अडथळा :

प्रवाशांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बस स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याची आणि सुरक्षारक्षकांची संख्या दुप्पट करण्याची गरज आहे. स्वारगेट बसस्थानकाला रिक्षा स्टँडचा विळखा होता, ज्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण होत होते. बलात्काराच्या घटनेनंतर, एसटी प्रशासनाने स्वारगेट आगारातील रिक्षा स्टँड हटवले आहे, पण हे तात्पुरते पाऊल आहे.

पुणे स्टेशनवर ७ रक्षक :

पुणे स्टेशनवर दररोज अनेक गाड्या येतात आणि जातात, मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असूनही,येथे फक्त ७ सुरक्षारक्षक आहेत, जे अपुरे आहेत.एसटी बस स्थानकांवर पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

News Title: Inadequate Security at Pune Bus Stations; Rise in Crime Incidents

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now