“प्रसारमाध्यमांवरील छापेमारी कुठल्या लोकशाहीत बसते?”

On: February 14, 2023 4:16 PM
Uddhav Thackery
---Advertisement---

नवी दिल्ली | दिल्लीतील आणि मुंबईतील बीबीसीच्या(BBC) कार्यालयावर आयकर विभागानं(Income Tax Department) छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या कर्मचाऱ्यांचे मोबाईलदेखील जप्त केले आहेत.

बीबीसीच्या कार्यालयांवर छापे टाकल्यानं राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे.

त्यातच उद्धव ठाकरेंनीही(Uddhav Thackeray) यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांवरील छापेमारी कुठल्या लोकशाहीत बसते?, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे. माध्यमांचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही या प्रकरणी बोलताना थेट मोदींवर टीका केली आहे. 56 इंचाची छाती किती भित्री आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे, अशा शब्दांत पटोलेंनी मोदींवर निशाणा साधला.

दरम्यान, बीबीसी वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माहितीपट(BBC Documentary On PM Narendra Modi)बनवला होता. यावरून बीबीसी आणि केंद्र सरकार यांच्यात वाद पेटला होता. त्यातच आता बीबीसीच्या कार्यालयांवर आयकर विभागानं छापे टाकल्यानं विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now