नाना पटोलेंसमोर मोठा राडा, कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले

On: October 12, 2023 4:25 PM
---Advertisement---

नागपूर | काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं. दोन नेत्याध्ये वाद होऊन प्रचंड गोंधळ झाला. त्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहे.

काँग्रेसकडून पूर्व विदर्भातील जिल्हानिहाय आढावा बैठक नागपूरच्या (Nagpur) महाकाळकर सभागृहात ठेवली होती. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झालं. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. हा सगळा प्रकार काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासमोर झाला घडला. यावेळी नाना पटोलेदेखील समोर होते.

नरेंद्र जिचकार (Narendra Jichkar) आणि विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांच्यात जोरदार वादावादी आणि राडा झाला. या बैठकीतच माझा घातपात करण्याचा डाव होता, असा धक्कादायक आरोप जिचकार यांनी केला.

दरम्यान, विकास ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र जिचकार यांना धक्काबुक्की करून व्यसपीठावरून खाली खेचलं. यात काही कार्यकर्त्यांचे कपडे देखील फाटले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now