थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

On: November 27, 2024 12:30 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | महाराष्ट्रात हळूहळू गारठा जाणवू लागला आहे. कारण आता उत्तर महाराष्ट्रात चांगलीच हुडहुडी जाणवत आहे. अशातच गेल्या आठ दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे. राज्यातील पुणे, मुंबईसह अनेक शहरांचा (Weather Update) किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुण्याचे तापमान दहा अंशावर आले आहे. मुंबईतील तापमानात विक्रमी घसरण झाली आहे.

सध्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरचं किमान तापमान तब्बल 10 ते 11 अंश सेल्सिअस एवढ्या निच्चांक स्तरावर घसरलंय. त्यामुळे इथल्या नागरिकांना अक्षरश: बोचणारी थंडी सोसावी लागतेय.

कोकणातही गेल्या काही दिवसांपासून थंडी प्रचंड वाढलीये. पुणेकरही गारठले (Weather Update) आहेत. पुण्याचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअसवर घसरलंय, त्यामुळे पुणेकरांना कडाक्याची थंडी सहन करावी लागतेय. पुण्याच्या किमान तापमानातली ही सर्वाधिक घट आहे.

Weather Update | चक्रीवादळामुळे शाळांना सुट्टी

हवामान विभागाने 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी मयिलादुथुरई, तिरुवरूर, नागपट्टिनम, चेन्नई, तिरुवल्लुर, कांचीपूरम, चेंगलपेट आणि कडलोर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे प्रशासनाने 27 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, भाजपकडे केली सर्वात मोठी मागणी

सर्वात मोठी बातमी! नाराज एकनाथ शिंदेंना भाजपकडून दोन मोठ्या ऑफर

मुंबईकरांनो ‘या’ भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणारं!

मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा!

आताची सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री…

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now