IMD Weather Update | भारतीय हवामान विभागाने (IMD Weather Update) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे. पुढील महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
चक्रीवादळाची स्थिती
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम राजस्थान (Rajasthan), पूर्वोत्तर आसाम (Assam) आणि पूर्वोत्तर बांगलादेशमध्ये (Bangladesh) चक्रीवादळाची (Cyclone) स्थिती निर्माण झाली असून, वाऱ्याचा वेग ताशी 125 किमी पर्यंत आहे.
या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज
या चक्रीवादळसदृश स्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या विविध भागांमध्ये पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) आणि अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) पाऊस झाला आहे. (IMD Weather Update)
आज अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशसह आज आसाम, सिक्कीम (Sikkim), उत्तराखंड (Uttarakhand) आणि हिमाचल प्रदेशमध्येही (Himachal Pradesh) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.
महाराष्ट्रातील हवामान
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास, राज्यात हवामानात फारसा बदल होणार नाही, थोडेसे तापमान वाढण्याचा अंदाज आहे.
Title : IMD Weather Update Less Cold in North India Rain Expected in Some States






