रायगडमध्ये बंदी काळात बेकायदा मासेमारी जोरात, २२ जणांवर कारवाई

On: July 11, 2025 2:50 PM
Raigad
---Advertisement---

Raigad | पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी सुरू असूनही रायगड (Raigad) जिल्ह्याच्या समुद्रात बेकायदा मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेषतः उरण (Uran) तालुक्यात हे प्रमाण सर्वाधिक असून, मत्स्यव्यवसाय विभागाने (Fisheries Department) आतापर्यंत २२ जणांवर कारवाई करत १८ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे.

काय आहे प्रकरण?

माशांच्या प्रजनन काळात त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी सरकार दरवर्षी पावसाळ्यात मासेमारीवर बंदी घालते. मात्र, अनेक पर्ससीन नेटधारक आणि स्थानिक मच्छीमार या बंदीचे उल्लंघन करून मासेमारी करत आहेत. यामुळे पर्ससीन नेटधारक आणि पारंपरिक मच्छीमार यांच्यात संघर्ष निर्माण झाला असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे.

२२ जणांवर दंडात्मक कारवाई-

मत्स्यव्यवसाय विभागाने १ जूनपासून सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत २२ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच, दोषी ठरलेल्या २२ बोटींचे डिझेल अनुदान एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. पुन्हा गुन्हा केल्यास या बोटींचा मासेमारी परवाना कायमचा रद्द करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.

कारवाईसाठी विभागाकडून दोन वेगवान गस्ती नौकांद्वारे टेहळणी केली जात आहे. तरीही उरण, करंजा, मुरुड, श्रीवर्धन यांसारख्या अनेक ठिकाणी बेकायदा मासेमारी सुरूच आहे. कारवाईदरम्यान अनेकदा राजकीय दबावाचा सामना करावा लागतो, असे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील (Sanjay Patil) यांनी सांगितले. एका बाजूला कारवाईसाठी दबाव आणला जातो, तर दुसऱ्या बाजूला कारवाई झालेल्या बोटी सोडण्यासाठी फोन येतात, असेही ते म्हणाले.

News Title –  Illegal Fishing Rampant in Raigad Despite Ban

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now