PBKS vs RCB क्वालिफायर 1 रद्द झाल्यास, ‘या’ संघाला मिळणार फायनलमध्ये थेट एंट्री!

On: May 29, 2025 1:58 PM
PBKS vs RCB Qualifier 1
---Advertisement---

PBKS vs RCB Qualifier 1 | आयपीएल 2025 च्या प्लेऑफ फेरीला 29 मेपासून सुरुवात होत असून, क्वॉलिफायर 1 मध्ये पंजाब किंग्स (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हे दोन दिग्गज संघ आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना मोहालीतील मुल्लांपूर स्टेडियममध्ये रंगणार आहे. मात्र हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाच्या नावे लागेल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (PBKS vs RCB Qualifier 1)

पावसामुळे सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोण? :

पंजाब किंग्स आणि आरसीबी या दोन्ही संघांनी लीग फेरीत उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रत्येकी 19 गुणांची कमाई केली आहे. मात्र नेट रनरेटच्या आधारावर पंजाब किंग्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे, तर आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे.

बीसीसीआयच्या नियमानुसार जर क्वॉलिफायर 1 चा सामना पावसामुळे रद्द झाला, तर गुणतालिकेत टॉपला असलेल्या संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे अशा परिस्थितीत पंजाब किंग्स थेट अंतिम फेरीत पोहोचेल, तर आरसीबीला क्वॉलिफायर 2 मध्ये दुसरी संधी दिली जाईल. (PBKS vs RCB Qualifier 1)

PBKS vs RCB Qualifier 1 | नेट रनरेटने निर्णायक भूमिका बजावली :

दोन्ही संघांनी साखळी फेरीत 14 सामने खेळले असून, त्यापैकी 9 सामने जिंकले, 4 सामन्यांत पराभव स्वीकारला आणि 1 सामना पावसामुळे रद्द झाला.

पंजाब किंग्सचा नेट रनरेट +0.372 असून, आरसीबीचा +0.301 आहे. त्यामुळे क्वॉलिफायर 1 रद्द झाल्यास पंजाबचा संघ फायनलमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट आहे. (PBKS vs RCB Qualifier 1)

News Title: If PBKS vs RCB Qualifier 1 is Washed Out, Who Goes to Final? Here’s What IPL 2025 Rules Say

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now