Hinjawadi Fire Accident | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये झालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स जळीतकांडाने खळबळ उडवली असून, ही घटना अपघात नसून हेतुपुरस्सर घातपात असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. टेम्पो चालक जनार्दन हंबर्डीकर (Janardan Hambardekar) याने आपल्या सहकाऱ्यांवर सूड घेण्यासाठी ही भयंकर योजना आखली होती. (Hinjawadi Fire Accident)
घटनेचा संपूर्ण तपशील
19 मार्च रोजी सकाळी 8 वाजता व्योमा ग्राफिक्स कंपनीचे 12 कर्मचारी टेम्पोने कामावर जात असताना हिंजवडी फेज 1 मध्ये टेम्पोमध्ये आग लागली. यावेळी पुढच्या सीटवर बसलेल्यांनी तत्काळ उडी मारून स्वतःचा जीव वाचवला.
मात्र, मागचे दार लॉक असल्याने चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, चालकाने या कटमागील कारण देखील उघड केलं आहे. पगार आणि बोनस न मिळाल्याचा राग, तसेच मजुरीची कामं देण्याने खच्चीकरण झाल्याची भावना निर्माण झाली होती. या रागातूनच जनार्दनने गाडी पेटवण्याचा कट रचला असल्याचं कबूल केलंय. पोलीस तपासात समोर आले की, या घटनेच्या आदल्या दिवशीच त्याने हा घातपात ठरवला होता.
या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे:
सुभाष भोसले, वय 42
शंकर शिंदे, वय 60
गुरुदास लोकरे, वय 40
राजू चव्हाण, वय 40
(सर्व पुणे येथील रहिवासी)
जखमींची नावे:
प्रदीप राऊत
प्रवीण निकम
चंद्रकांत मलजीत
संदीप शिंदे
विश्वनाथ झोरी
जनार्दन हंबर्डीकर (आरोपी चालक)
दरम्यान, पोलिसांनी जनार्दनवर IPC अंतर्गत खुनाचा व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिक खोलवर सुरू असून, घटनेच्या नाट्यमय वळणामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. (Hinjawadi Fire Accident)
Title : Hinjawadi fire accident Tempo Driver Shocking Revenge Plan








