HSRP नंबरप्लेटसाठी नवीन अंतिम मुदत; कशी कराल ऑनलाइन नोंदणी?

On: March 21, 2025 2:20 PM
BH Number Plate
---Advertisement---

High Security Number Plate | राज्यातील सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, अद्याप बऱ्याच वाहनांनी ही नंबरप्लेट बसवलेली नसल्यामुळे परिवहन आयुक्तांनी अंतिम मुदतीत पुन्हा वाढ करत ती 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. आतापर्यंत केवळ सुमारे 18 लाख वाहनचालकांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.

आतापर्यंत फक्त 18 लाख वाहनांनी HSRP घेतली

राज्यातील लाखो वाहनांमध्ये केवळ 18 लाख वाहनांवरच HSRP लावण्यात आली आहे. या प्रक्रियेबाबत तक्रारी, महागड्या शुल्काबाबत आरोप आणि एजन्सींच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात उशीर झाला. याआधी दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता तिसऱ्यांदा 30 जूनपर्यंतची डेडलाईन जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया कशी कराल?

HSRP नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइटवर ( http://transport.maharashtra.gov.in ) जाऊन अर्ज करता येतो. त्यासाठी:

  • Google वर ‘hsrp number plate’ शोधा
  • महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट उघडा
  • ‘Apply High Security Registration Plate Online’ या लिंकवर क्लिक करा
  • कार्यालय निवडा आणि ‘APPLY HSRP’ वर क्लिक करा
  • ‘Order HSRP’ वर क्लिक केल्यानंतर गाडीचा Registration Number, चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक, इंजिन नंबरचे शेवटचे 5 अंक आणि मोबाईल नंबर टाका
  • यानंतर पेमेंटचं पेज उघडेल

HSRP साठी किती शुल्क आकारले जाते?

  • दुचाकी व ट्रॅक्टर: ₹450
  • तीनचाकी: ₹500
  • चारचाकी व अन्य वाहने: ₹745

Title : High Security Number Plate Deadline Extended to June 30

 

Join WhatsApp Group

Join Now