Republic Day Security | 77 वा प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून देशभर जोरदार तयारी सुरू आहे. दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर भव्य सोहळ्याची आखणी होत असताना सुरक्षा यंत्रणांनीही सतर्कतेचा उच्चांक गाठला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांचे फोटो असलेले पोस्टर जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. (Delhi Police posters)
या पोस्टरमध्ये पहिल्यांदाच दिल्लीतील एका संशयित दहशतवाद्याचा फोटो समाविष्ट करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दिल्लीसह मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू आणि अमृतसर या शहरांमध्येही सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
मोहम्मद रेहानचा शोध तीव्र :
सहा संशयित दहशतवाद्यांच्या यादीत मोहम्मद रेहानचा समावेश असून तो ‘अलकायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट’ (AQIS) या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती आहे. सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा त्याचा दीर्घकाळापासून शोध घेत असून तो भारतात मोठ्या दहशतवादी कारवाईची योजना आखत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून तो बेपत्ता असल्याने चिंता अधिक वाढली आहे. (Terror alert India)
26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य पथ परिसरात अत्यंत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध गुप्तचर संस्थांकडून माहिती गोळा करून संशयित हालचालींवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.
Republic Day Security | सीसीटीव्ही, एआय प्रणालीद्वारे कडक नजर :
संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून एआय आणि एफआरएस प्रणालीद्वारे संशयित व्यक्ती ओळखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संशयास्पद हालचाल किंवा वाहन आढळताच संबंधित यंत्रणांना तात्काळ सूचना मिळतात, ज्यामुळे कारवाई जलद होण्यास मदत होते. (Republic Day Security)
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये बसलेले दहशतवादी भारतात हल्ल्याची योजना आखत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या आधी संपूर्ण देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






