पुणेकरांनो 15 जूनपासून शहरात ‘या’ वाहनांवर कडक निर्बंध; कधी आणि कुठे असणार नो एन्ट्री?

On: June 12, 2026 2:59 PM
Solapur Traffic Diversion
---Advertisement---

Pune Traffic News | पुणे (Pune) शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील कोंडी कमी करणे आणि अपघातांना आळा घालणे या उद्देशाने आगामी काही दिवसांसाठी जड व अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे विविध महामार्गांवरून पुण्यात येणाऱ्या मालवाहतूक वाहनांवर थेट परिणाम होणार आहे.

15 ते 24 जूनदरम्यान नो एन्ट्री लागू :

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार 15 जून ते 24 जून या कालावधीत पुणे शहराच्या हद्दीत जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि त्यातून उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या मते, शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरळीत करण्यासाठी ही उपाययोजना आवश्यक ठरली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, 2026 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत जड वाहनांशी संबंधित सुमारे 30 गंभीर अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातांमध्ये 31 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कठोर भूमिका घेतली आहे. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हा विशेष निर्णय अमलात आणण्यात येणार आहे.

Pune Traffic News | महामार्गांवरील वाहनांना मोठा फटका :

या बंदीचा सर्वाधिक परिणाम सोलापूर (Solapur), अहिल्यानगर (Ahilyanagar), नाशिक (Nashik), मुंबई (Mumbai) आणि सातारा (Satara) मार्गांवरून पुण्यात येणाऱ्या जड तसेच मल्टी-ॲक्सल वाहनांवर होणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना या कालावधीत पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरातील अंतर्गत वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी या दहा दिवसांच्या कालावधीत विशेष लक्ष दिले जाणार आहे. जड वाहनांची संख्या कमी झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल आणि अपघातांचे प्रमाणही घटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस विभाग आणि वाहतूक प्रशासनाने वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे.

News Title: Heavy Vehicles Banned In Pune

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now