“प्रत्येक मुलीसोबत झोपायचा..”; आरोपांवर प्रसिद्ध अभिनेता हर्षद अरोराने अखेर सोडलं मौन

On: June 6, 2025 11:43 AM
Harshad Arora Controversy
---Advertisement---

Harshad Arora Controversy | प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता हर्षद अरोरा (Harshad Arora Controversy) सध्या त्याच्या ‘हाले दिल’ या नव्या शोमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रीतिका रावने (Preetika Rao) त्याच्यावर गंभीर आरोप करत तो ‘स्त्रीलंपट’ असल्याचा दावा केला होता. आता एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हर्षदने प्रीतिकाच्या या आरोपांवर मौन सोडले आहे. “या सर्व बालिश गोष्टी आहेत. जर तिने हे सर्व प्रसिद्धीसाठी केलं असेल तर ते खूप चुकीचं आहे,” असे तो म्हणाला. प्रीतिका राव ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावची बहीण असून, अमृताने बॉलिवूडमध्ये नाव कमावले, तर प्रीतिका टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कार्यरत आहे. (Preetika Rao Allegations)

मला कोणालाच स्पष्टीकरण द्यायची गरज नाही :

प्रीतिकाच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना हर्षद पुढे म्हणाला, “मी त्या सर्व गोष्टींना विसरून गेलोय, कारण मला तिच्या पातळीवर घसरून सूड घ्यायचा नाहीये. मी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकलो असतो, पण मी तसं केलं नाही.” हर्षदने प्रश्न उपस्थित केला की, “जर तिच्या आरोपांमध्ये सत्य असतं तर इतर लोक समोर येऊन का बोलले नाहीत? मी तर अनेकांसोबत काम केलंय. हे सर्व इतक्या नंतर बोलण्याचा काय अर्थ आहे?” (Harshad Arora Controversy)

तो पुढे म्हणाला, “जे लोक मला ओळखतात, त्यांना माहीत आहे की मी कसा आहे? मला कोणालाच स्पष्टीकरण द्यायची गरज नाही.” त्याने या परिस्थितीला “किती विचित्र गोष्ट आहे की तुम्ही दहा-बारा वर्षांपूर्वी एकासोबत काम करता आणि इतक्या वर्षांनंतर अचानक तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव होते,” असे म्हटले. (Preetika Rao Allegations)

Harshad Arora Controversy | हर्षद अरोरा आणि प्रीतिका रावची जोडी सोशल मीडियावर हिट होती :

हर्षद अरोरा (Harshad Arora) आणि प्रीतिका राव यांनी २०१४ मध्ये ‘बेइम्तिहा’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेतील दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची खूप चर्चा झाली होती आणि त्यांची जोडी सोशल मीडियावरही हिट झाली होती. या दोघांच्या केमिस्ट्रीचे अनेक व्हिडिओ ‘कंटेंट क्रिएटर्स’कडून व्हायरल केले जातात. अशाच एका व्हिडिओवर प्रीतिकाने संतप्त प्रतिक्रिया दिली होती.

तिने लिहिले होते की, “तुला लाज वाटली पाहिजे. मी तुला सतत विनंती करूनही तू माझे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत राहिलीस. इंडस्ट्रीत भेटलेल्या प्रत्येक मुलीसोबत झोपणाऱ्या या व्यक्तीसोबतचे माझे व्हिडिओ पोस्ट करू नकोस.” तिची ही कमेंट तुफान व्हायरल झाली होती. याविषयी प्रीतिकाशी संपर्क साधला असता तिने प्रतिक्रिया देणे टाळले आहे. (Harshad Arora Controversy)

News Title: “He Slept with Every Girl…”: Famous Actor Finally Breaks Silence on Allegations

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now