हार्दिक पांड्याने मुंबईला ठोकला रामराम; जाणून घ्या कुठं झाला शिफ्ट

On: June 30, 2026 7:42 PM
Hardik Pandya
---Advertisement---

Hardik Pandya | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला अधिक काळ यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या हार्दिकने आता आपला कायमस्वरूपी प्रशिक्षण तळ मुंबई (Mumbai) येथून बंगळुरू (Bengaluru) येथे हलवण्याचा निर्णय घेतला असून, हा त्याच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा मानला जात आहे.

फिटनेसला प्राधान्य देत घेतला मोठा निर्णय :

हार्दिक पांड्याने आतापर्यंत कोणत्याही मोठ्या भारतीय क्रिकेटपटूने न घेतलेला निर्णय घेत आपल्या प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र बंगळुरू येथे स्थलांतरित केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) येथे तो यापुढे नियमित सराव आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करणार आहे. भारतीय संघ, आयपीएल (IPL) किंवा देशांतर्गत क्रिकेटच्या जबाबदाऱ्या नसतील, त्या काळात हार्दिकचा बहुतांश वेळ याच प्रशिक्षण केंद्रात जाणार आहे.

हा केवळ शहर बदलण्याचा निर्णय नसून त्याच्या संपूर्ण क्रिकेट नियोजनाचा भाग असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही वर्षांत हार्दिकला घोटा, पाठ आणि अलीकडे क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे अनेक महत्त्वाच्या मालिका आणि स्पर्धा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे उर्वरित कारकीर्द अधिक काळ टिकावी आणि दुखापतींपासून बचाव व्हावा, यासाठी त्याने फिटनेस आणि रिकव्हरीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

Hardik Pandya | मुंबईऐवजी आता बंगळुरूत होणार सराव :

मूळचा बडोदा (Vadodara) येथील असलेला हार्दिक पांड्या गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होता. तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) च्या हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये नियमित सराव करत होता. मात्र, बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, लोअर परळ (Lower Parel) येथील निवासस्थानातून दररोज सरावासाठी प्रवास करणे त्याच्यासाठी वेळखाऊ आणि थकवणारे ठरत होते.

याउलट बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा, पुनर्वसन (रिकव्हरी), फिटनेस प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाची सर्व साधने एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. याच सुविधांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी हार्दिकने सेंटर ऑफ एक्सलन्सच्या परिसरालगत बंगळुरूच्या बाहेरील भागात घर भाड्याने घेतले आहे. यापुढे हेच ठिकाण त्याचे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र असणार असून, या निर्णयामुळे त्याच्या फिटनेस आणि क्रिकेट कारकिर्दीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

News Title: Hardik Pandya Shifts Base to Bengaluru

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now