“कुणीतरी लवकरच रस्त्यावर..”; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच हार्दिकच्या बायकोची खळबळजनक पोस्ट

On: May 25, 2024 8:54 PM
Hardik Pandya Natasa Stankovic post viral 
---Advertisement---

Hardik Pandya Natasa Stankovic | क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या पर्सनल लाईफबद्दल वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर हार्दिक पांड्या त्याच्या व्यक्तीगत आयुष्यामुळे चर्चेत आलाय. हार्दिकचे पत्नी नताशा स्टँकोव्हिचसोबत संबंध बिघडल्याचं सध्या म्हटलं जातंय.

इतकंच नाही तर, ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं देखील म्हटलं जातंय. अशात नताशाची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत आलीये. नताशाने पोस्ट केलेल्या स्टोरीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

हार्दिकच्या बायकोच्या पोस्टने खळबळ

नताशाने रस्ते नियम संबंधी एक फोटो पोस्ट करत त्याला ‘लवकरच कुणीतरी रस्त्यावर येणार आहे’, असं कॅप्शन दिलंय. या फोटो पोस्टमुळे सोशल मीडियावर युझर्स वेगवेगळे तर्क लावत आहेत. याचा संबंध नेटकरी थेट हार्दिकसोबत जोडत आहेत.

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तसं पाहायला गेलं तर अद्याप दोघांनी याबाबत काहीच भाष्य केलं नाहीये. अशात अजून एका गोष्टीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

हार्दिक पांड्याच्या संपत्तीत नताशा स्टँकोव्हिचला 70 टक्के वाटा मिळणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, 2018 मध्ये हार्दिक आणि नताशाच्या (Hardik Pandya Natasa Stankovic) अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये साखरपुडा करत सर्वांनाच धक्का दिला. जुलै 2020 मध्ये त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा झाला. हार्दिक आणि नताशा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केले. आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

Hardik Pandya wife Natasa Stankovic

या कारणांमुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा-

हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच (Hardik Pandya Natasa Stankovic) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियात रंगू लागल्या आहेत. नताशाने स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून पांड्या हे आडनाव काढून टाकले आहे. तिच्या या कृतीनंतर हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटांच्या चर्चांना जोरदार सुरुवात झाली.

नताशानं फक्त आपल्या नावातलं पांड्या आडनावच हटवलं नाही तर ती हार्दिक सोबत दिसेनाशी झाली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे, मात्र सुरुवातीला हार्दिक पांड्याला चिअर्स करण्यासाठी मैदानात दिसणारी नताशा गेल्या काही सामन्यांमध्ये मैदानात दिसून आलेली नाही.

News Title : Hardik Pandya Natasa Stankovic post viral 

महत्त्वाच्या बातम्या-

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच नताशाच्या डेटिंगच्या चर्चा; हार्दिक पांड्यापूर्वी कुणाच्या प्रेमात होती?

48 तासांत ‘रेमल’ चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

“कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहेत काय?”

शिखर धवन ‘या’ महिला क्रिकेटरशी करणार दुसऱ्यांदा लग्न?; स्वतःच केला मोठा खुलासा

ग्राहकांनो खरेदीची करा घाई! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

Join WhatsApp Group

Join Now