पुणे जिल्ह्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचा कहर; रूग्णांची चिंताजनक आकडेवारी समोर

On: January 30, 2025 9:53 AM
Pune News
---Advertisement---

Pune News l शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विषाणूचा (Virus) शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. आतापर्यंत 127 संशयित रुग्ण (Suspected Patients) आढळले आहेत.

ग्रामीण भागात 9 रुग्ण, पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत 93, पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हद्दीत 13 आणि इतर जिल्ह्यांतील 9 रुग्ण अशा एकूण 127 रुग्णांवर सध्या पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत (Hospitals) उपचार सुरू आहेत. यापैकी 20 रुग्ण अतिदक्षता (ICU – Ventilator) विभागात आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Public Health Department) दिली.

दरम्यान, बुधवारी नव्याने 16 रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी रुग्ण न वाढल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. एकूण रुग्णसंख्येत 0 ते 9 आणि 10 ते 19 वयोगटातील मुलांची संख्या अधिक म्हणजे 18 इतकी आहे, तर 60 ते 69 वयोगटातील व्यक्तींची संख्या 10 आहे. त्यामुळे नागरिकांनी लहान मुलांसह वृद्ध व्यक्तींची (प्रतिकारशक्ती कमी असलेले) विशेष काळजी घ्यावी.

बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांकडे तातडीने जाऊन तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Pune News l गेल्या वर्षांत 20 रुग्ण :

पुणे शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या गेल्या वर्षभरात जवळपास 20 रुग्ण आढळले आहेत. परंतु या काळात उद्रेक (Outbreak) नव्हता. सध्या एका महिन्यात या आजाराचे रुग्ण सापडत आहेत, अशी माहिती ससून प्रशासनाकडून (Sassoon Administration) देण्यात आली. रुग्णांमध्ये 20 ते 29 वयोगटातील रुग्ण सर्वाधिक (30) आहेत. तर सर्वात कमी 60 नंतरचे वयोगटात हा आजार कमी आहे.

गुईलेन बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव सर्वच वयोगटात दिसून येत असला तरी, 20 ते 29 वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. नागरिकांनी या आजाराबाबत सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी.

News Title: Guillain-Barre-Syndrome-Outbreak-In-Pune-District-2-Deaths-127-Patients

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now