मी खूप काही सहन केलंय… घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदाच्या पत्नीचे धक्कादायक खुलासे

On: February 26, 2025 1:10 PM
Govinda-Sunita Marital Struggles Opens Up 
---Advertisement---

Govinda-Sunita | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा (Govinda) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपासून तो आणि त्याची पत्नी सुनीता (Govinda-Sunita) वेगळे राहत असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. 37 वर्षांच्या संसारानंतर हे दोघं विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहे. दोघांमध्ये मतभेद वाढल्याची माहिती देखील समोर आली आहे.

गोविंदासोबत लग्न आणि संघर्षाचा काळ

गोविंदा आणि सुनीता यांचं प्रेमविवाह झाला होता. मात्र, सुनीता यांच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपल्या लेकीच्या लग्नाला हजेरीही लावली नव्हती. हा प्रसंग फार कमी लोकांना माहिती आहे. गोविंदासोबत लग्न केल्यानंतर सुनीता यांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनातील संघर्षांबद्दल सांगितलं होतं.

त्या म्हणाल्या, “मी माझ्या पतीवर खूप प्रेम करत होते, म्हणूनच सर्व काही सहन केलं. माझी आई एका श्रीमंत कुटुंबातून होती, ती पॉश परिसरात राहत होती. मात्र, माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. त्यामुळे माझ्या लग्नाला ते उपस्थित राहू शकले नाहीत.” त्या पुढे म्हणाल्या की, “गोविंदासोबत लग्न करताना मला या संघर्षांची कल्पना नव्हती.”

लहान वयात संसार आणि जबाबदाऱ्या

सुनीता यांनी आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं की, “मी अवघ्या 18 व्या वर्षी गोविंदासोबत लग्न केलं. एका वर्षानंतर, म्हणजे 19 व्या वर्षी, मी मुलीची आई झाले. त्या वेळी मी स्वतःच लहान होते, काहीही समजत नव्हतं. गोविंदाच्या कुटुंबात खूप सदस्य होते, त्यामुळे परिस्थिती समजून घेणं कठीण जात होतं.”

त्याचप्रमाणे, त्यांनी लग्नानंतरच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की, “गोविंदाने मला स्पष्ट सांगितलं होतं की, जोपर्यंत त्याची आई आहे, तोपर्यंत तीच घराची प्रमुख असेल. मी प्रेमाखातर त्याची ही अट मान्य केली. त्या वेळी माझ्या मनात काही शंका नव्हती.” सध्या त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. (Govinda-Sunita)

गोविंदाने घटस्फोटाच्या चर्चांवर दिलं उत्तर

रिपोर्टनुसार, जेव्हा गोविंदाला घटस्फोटाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने यावर थेट भाष्य करणं टाळलं. तो म्हणाला, “सध्या व्यवसायाबद्दल चर्चा सुरू आहे. मी माझा सिनेमा तयार करण्याच्या तयारीत आहे.” यावर अधिक काही न बोलता, त्याने घटस्फोटाच्या चर्चांना बगल दिली आहे. मात्र, या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Title : Govinda-Sunita Marital Struggles Opens Up 

 

Join WhatsApp Group

Join Now