शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! खत खरेदीसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

On: May 26, 2026 6:39 PM
Agriculture News
---Advertisement---

Agriculture News | राज्यात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. शेती मशागत, बियाण्यांची खरेदी आणि पेरणीपूर्व नियोजन सुरू असतानाच खत टंचाईची भीती शेतकऱ्यांमध्ये वाढली होती. विशेषतः इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे खत पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मोबाईलवरून होणार खत बुकिंग :

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी (Deepak Gavli) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना आता घरबसल्या मोबाईलद्वारे खत बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे खत खरेदीसाठी होणारी धावपळ कमी होणार असून वेळेत खत उपलब्ध होण्यास मदत होईल.

राज्य शासनाच्या माध्यमातून (Chhatrapati Sambhajinagar) आणि कोल्हापूर (Kolhapur) या दोन जिल्ह्यांमध्ये खत बुकिंगसाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत विशेष मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले जात असून त्याद्वारे शेतकरी ऑनलाइन पद्धतीने खताची नोंदणी आणि बुकिंग करू शकतील. यामुळे खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

Agriculture News | दोन जिल्ह्यांत प्रायोगिक सुरुवात :

सध्या हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर केवळ दोन जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. या प्रयोगाला यश मिळाल्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ही सुविधा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे भविष्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना घरबसल्या खत बुकिंगची सुविधा उपलब्ध होऊ शकते.

मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. अशावेळी खत वेळेवर उपलब्ध होणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नवीन व्यवस्थेमुळे खताचा कृत्रिम तुटवडा कमी होण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्चही वाचणार असल्याचे सांगितले जात आहे.

News title : Government Starts Fertilizer Booking Plan

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now