Atal Pension Yojana | केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेला (Atal Pension Yojana) पुढील काही वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे लाखो लोकांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
कोण होऊ शकतो पात्र? :
अटल पेन्शन योजनेला आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार, छोटे व्यापारी, शेतकरी आणि स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना दरमहा थोडी बचत करून सुरक्षित भविष्य घडवण्याची संधी देते. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेअंतर्गत दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. (government pension scheme)
या योजनेत 18 ते 40 वयोगटातील नागरिक सहभागी होऊ शकतात. दरमहा कमी रक्कम भरून निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न मिळवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. सरकारने मुदतवाढ दिल्यामुळे आतापर्यंत नोंदणी न करू शकलेल्या नागरिकांना आता नव्याने संधी मिळणार आहे, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
Atal Pension Yojana | योजनेची वैशिष्ट्ये काय? :
या योजनेची खास बाब म्हणजे सरकारकडून खात्रीशीर पेन्शनची हमी दिली जाते. बाजारातील चढ-उतारांचा परिणाम पेन्शनवर होत नाही. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पती किंवा पत्नीला पेन्शन मिळते आणि नॉमिनीला एकरकमी रक्कम देण्याची तरतूद आहे. (Atal Pension Yojana)
तज्ज्ञांच्या मते, वाढती महागाई आणि अस्थिर रोजगाराच्या पार्श्वभूमीवर अटल पेन्शन योजना ही मध्यम व अल्प उत्पन्न गटासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सामाजिक सुरक्षेचा पाया अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






