Government Employee | दरवर्षी दिवाळीच्या आधी शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना रेल्वे विभागाकडून बोनस जाहीर झाला होता आणि आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही बोनस जाहीर झाला आहे. ((Government Employee Diwali Bonus)
‘ब’ आणि ‘क’ या संवर्गातील कर्मचाऱ्यांनाच बोनस मिळणार :
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस जाहीर झाला होता. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा बोनस मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना उत्पादकता-लिंक्ड बोनस दिला जाणार आहे.
या बोनसची रक्कम फक्त 6,908 निश्चित करण्यात आली आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे याचा लाभ सगळ्या कर्मचाऱ्यांना दिला जाणार नाही. फक्त शासकीय सेवेत असणाऱ्या ‘ब’ आणि ‘क’ या संवर्गातील कर्मचाऱ्यांनाच बोनस मिळणार आहे. (Government Employee Diwali Bonus 2025)
Government Employee | कोणाला मिळणार लाभ :
या सुविधेचा लाभ फक्त मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर केंद्रीय निमलष्करी दल, सशस्त्र दल आणि केंद्रशासित प्रदेशांमधील केंद्रीय नोकरदारांनाही होणार आहे.
31 मार्च 2025 पर्यंत सेवेत असणाऱ्या आणि किमान सहा महिने काम करणाऱ्यांना याचा लाभ मिळेल. कॅज्युअल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळणार आहे, पण त्याची रक्कम कमी राहणार आहे. जवळपास 1184 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. (Government Employee Diwali Bonus 2025)
कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या बोनसामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीला होणारा खर्च यामुळे त्यांना परवडणार आहे.






